नवी दिल्लीः स्वस्त किंमतीत स्मार्टफोन मिळत असेल तर तुम्ही अजूनही फीचर फोन कशाला वापरत आहात. ७ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचे स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. या स्मार्टफोन्समध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः Realme C11 रियलमी सी ११ स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा व २ मेगापिक्सलचा ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Infinix Smart HD 2021 इनफिनिक्स स्मार्ट एचडी २०२१ मध्ये २ जीबी रॅम आमि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ६.१ इचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर व ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनची किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे. वाचाः Redmi 8A Dual रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा व २ मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरे व ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Tecno Spark Go 2020 टेक्नो स्पार्क गो २०२० मध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा व ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हँडसेट मध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Gionee Max Pro जिओनी मॅक्स प्रो मध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्डच्य मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. हँडसेट मध्ये १३ मेगापिक्लचा प्रायमरी व २ मेगापिक्सलचा सेकंडरी रियर सेन्सर दिले आहेत. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d5yTjX