मुंबई: मराठी चित्रपट ''नं मास्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा फिचरचा पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर चित्रपटचे दिग्दर्शक म्हणाले, 'या चित्रपटाच्या कथेबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर मला खूप आनंद होतो. मस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाला पुरस्कार मिळणं ही मी आणि माझ्या टीमसाठी अभिमानाची गोष्ट आहे.' पगल्या चित्रपटाची कथा दोन मुलांभोवती फिरते. हा चित्रपट मुलांच्या निरागसतेवर आधारिक आहे. या चित्रपटाची कथा १० वर्षांची दोन मुलं ऋषभ आणि दत्ता आणि त्यांच्यासोबत असणारं कुत्र्याचं पिल्लू यांच्यावर आधारित आहे. एक कुत्र्याचं पिल्लू या दोन मुलांच्या आयुष्यात येतं. यापैकी एक मुलगा गावात राहणारा आहे तर दुसरा शहरात राहाणारा आहे. या दोघांची ही अनोखी कथा 'पगल्या' चित्रपटात साकारण्यात आली आहे. चित्रपट पगल्याला या आधी कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या लॉस वर्ल्ड प्रीमियर फिल्म अवॉर्डसमध्येही सन्मानित करण्यात आलं आहे. आतापर्यंत या चित्रपटानं लंडन, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फिलीपाइन्स, तुर्की, ईरान, अर्जेंटीना, लेबनॉन, बेलारूस, रूस, कजाकिस्तान, स्पेन, इस्राइल, अमेरिका आणि कनाडा या देशांमधील विविध चित्रपट महोत्सवात सहभाग घेतला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे हा चित्रपट अद्याप भारतात प्रदर्शित झालेला नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e7CjCa