मुंबई: हॉलिवूड अभिनेता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याचा जगभरात खूप मोठा चाहता वर्ग आहे. सध्या ड्वेनची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होते आहे ती त्यानं, 'जर कधी अमेरिकेचं राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळाली तर ती माझ्यासाठी अभिमानची गोष्ट असेल' असं वक्तव्य केल्यामुळे. एका सर्वेक्षणातून अमेरिकेच्या ४६ टक्के जनतेला असं वाटतं की ड्वेननं राष्ट्रपती पदासाठी आपली उमेदवारी सादर करावी अशी बाब समोर आली. यावर प्रतिक्रिया देतानाच ड्वेननं अशी संधी मिळाली तर मी ही अभिमानाची गोष्ट समजतो असं म्हटलं आहे. WWE चा रेसलर ते उत्कृष्ट अभिनेता असा प्रवास करणाऱ्या ड्वेननं इन्स्टाग्रामवर वरील एका पोस्टमध्ये एक लेख शेअर केला आहे. ज्यात म्हणण्यात आलं आहे की, 'कमीत कमी ४६ टक्के अमेरिकन जनता ड्वेन जॉनसनला राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दाखल करण्यास आपला पाठिंबा देत आहेत.' ड्वेननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, खूपच सुखद, पण मला मला नाही वाटत की, आमच्या संस्थापक सदस्यांनी कधी विचार केला असेल की, कोणी सहा फूट चार इंच उंच, टक्कल आणि शरीरभर टॅटू असलेला अर्धा कृष्णवर्णीय, अर्धा समाओ, टकीला पिणारा व्यक्ती त्यांच्या क्लबमध्ये सहभागी होईल. पण जर असं झालं तर माझ्यासाठी ही खूपच सन्मानाची बाब आहे. ड्वेनचे वडील कृष्णवर्णीय होते तर आई समाओमध्ये राहणारी होती. तसं पाहायला गेलं तर अमेरिकेचं राष्ट्रपतीपद भूषणवण्याची इच्छा व्यक्त करण्याची ड्वेनची ही पहिली वेळ नाही. याआधीही २०१७ मध्ये त्यानं राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दाखल करण्याविषयी आपण गांभीर्यानं विचार करता असल्याचं म्हटलं होतं. ड्वेनला WWE मुळे '' या नावानेही ओळखलं जातं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e0oMMD