मुंबई टाइम्स टीम एकांकिका या माध्यमामुळे मनोरंजनविश्वाला सातत्यानं नवनवीन चेहरे मिळाले आहेत. सिनेसृष्टीत स्थिरावलेल्या अनेकांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एकांकिकेपासूनच केली होती. अलीकडी एकांकिका करणारी कलाकार मंडळी अनेक मालिका आणि चित्रपटात कमालीची कामगिरी करताना दिसत आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे . एकांकिका ते युट्यूबर आणि आता मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली असून तिची लोकप्रियता वाढताना दिसतेय. '' या मालिकेच्या तिसऱ्या पर्वात भाग्या अभिरामची बायको कावेरीची भूमिका साकारत आहे. तिचा रंगभूमीवरचा प्रवास कॉलेजपासून सुरू झाला. युथ फेस्टिव्हलमधील 'मादी' या एकांकिकेपासून तिनं आपल्या अभिनयाची सुरुवात केली. युथ फेस्टिव्हल, इप्टा, आयएनटी अशा मानाच्या अनेक एकांकिका स्पर्धेत तिनं प्रेक्षक आणि परिक्षकांची मनं जिंकली. एकांकिका, नाटक करत असताना तिची ओळख सुमित चव्हाणशी झाली. सुमितच्या 'इट्सच' या युट्यूब चॅनलच्या सुरुवातीच्या काळात भाग्याबरोबर केलेल्या 'स्कूल फ्रेंड क्रश' आणि 'कुछ मिठा हो जाये' या युट्यूब वेब सीरिजनं चांगलाच प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद बघता दोघांनी इट्सच या चॅनलद्वारे अनेक मैलाचे दगड पार केले. अशातच भाग्या शॉर्ट फिल्म नाटक एकांकिका आणि मॉडेलिंग करत होती. तिच्या दाक्षिणात्य वळणाच्या मराठीच्या अनेक जण प्रेमात पडले आहेत. ''मध्ये मूळची दाक्षिण्यात दाखवलेल्या कावेरीच्या भूमिकेतली भाग्य अनेकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cT6RrF