Full Width(True/False)

राजीव कपूर यांच्या संपत्तीसाठी रणधीर आणि रीमा कोर्टात;मात्र, 'ही' आहे अडचण

मुंबई : हिंदी सिनेमासृष्टीतील कपूर घराण्याची जादू जगजाहीर आहे. या घराण्यातील तीन जणांनी वर्षभरात या जगाचा निरोप घेतला आहे. ३० एप्रिल २०२० मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले तर त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२१ ला यांचे निधन झाले. चार भावंडांपैकी दोन भावांचे निधन झाले आहे तर आता फक्त आणि त्यांची बहिण हयात आहेत. या दोघांनी राजीव कपूर यांच्या संपत्तीवर आपला हक्क असल्याची याचिका मुंबई हायकोर्टामध्ये सोमवारी दाखल केली. त्यानंतर हायकोर्टाने या दोघांना राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचे पेपर्स कोर्टात जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी रणधीर कपूर आणि रीमा जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की राजीव कपूर यांनी २००१ मध्ये आरती सबरवाल यांच्याशी लग्न केले होते आणि २००३ मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला होता. ते पेपर्स कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर रणधीर कपूर आणि रीमा जैन यांचे वकील शरण जगतियानी यांनी कोर्टात सांगितले की, राजीव कपूर आणि आरती सबरवाल यांच्या घटस्फोटाचे पेपर्स त्यांच्याकडे नाहीत आणि या दोघांनी कोणत्या फॅमिली कोर्टात जाऊन घटस्फोट घेतला हे त्यांना माहिती नाही. शरण जतानिया यांनी कोर्टात असेही सांगितले की, राजीव कपूर यांच्या संपत्तीचे हे दोघेजण वारस आहेत. त्यांच्याकडे राजीव यांच्या घटस्फोटाचे पेपर्स नाहीत. परंतु ते शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ती सापडली नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांना हे पेपर्स सादर करण्यामध्ये मुभा द्यावी अशी विनंती केली. या दोघांचा घटस्फोट मुंबई कोर्टात झाला की दिल्ली कोर्टात याचीही माहिती या दोघांना नसल्याचेही वकिलांनी कोर्टात सांगितले. यावर न्यायमूर्ती गौतम यांनी सांगितले की, या दोघांच्या घटस्फोटाचे पेपर्स सादर करण्यात सूट देण्यास कोर्ट तयार आहे परंतु त्यासाठी या दोघांनी तसे स्वीकृती पत्र द्यावे असे सांगत या प्रकरणावरील सुनावणी स्थगिती केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xt7YXt