मुंबई- बॉलवूडमधील दोन महान कलाकार आणि दिलीप कुमार यांची वडिलोपार्जित घरे आजही पाकिस्तानात आहेत. अर्थात या घरांची अवस्था फारशी चांगली नाही. त्यामुळे त्यांच्या घरांचे जतन केले जावे अशी मागणी त्यांचे चाहते अनेक वर्षांपासून करत आहे. त्यांची ही विनंती लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने त्यावर सकारात्मक विचार केला आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वाह या राज्यात राज कपूर आण दिलीप कुमार यांची घरे आहेत. ही घरे तिथले राज्य सरकार भूमी संपादन अधिनियम कायदा १८९४ नुसार या दोन्ही अभिनेत्यांची घरे सरकार त्याब्यात घेणार आहेत. सध्या ही घरे ज्यांच्या ताब्यात आहेत, त्या घरमालकांना स्थानिक जिल्हाधिकारी त्याचा योग्य तो मोबदला देतील. दिलीप कुमार यांच्या घराचे मूल्य ८०. ५६ लाख रुपये तर राज कपूर यांच्या घराचे मूल्य १.५० कोटी रुपये इतकी ठरवली आहे. ही किंमत पाकिस्तानमधील पुरातत्व विभागाने ठरवली आहे. या दोन्ही घरांच्या मालकांनी यापेक्षा जास्त मूल्य दिले जावे अशी मागणी सरकारकडे केली होती. परंतु राज्य सरकारच्या मते या घरमालकांची मागणी अवास्तव असून ते ब्लॅकमेल करत आहेत, असे सरकारने सांगितले आहे. राज कपूर यांचे घर कपूर हवेली म्हणून ओळखले जाते. त्यांचे घर किस्सा ख्वानी बाजारपेठेत आहे. हे घर राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी बांधले होते. या घरापासूनच काही अंतरावर दिलीप कुमार यांचे घर आहे. दरम्यान, राज कपूर, दिलीप कुमार यांच्याप्रमाणेच सुपरस्टार शाहरुख खान याचे वडील ही मूळ पेशावरचेच होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fQ5Jae