मुंबई: अभिनेत्री विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अंधेरी मेट्रोपोलिटन न्यायालयानं अभिनेत्रीच्या विरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. जामिया मिल्लिया इस्लामियाची विद्यार्थीनी सफूरा जरगरच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याबद्दल न्यायालयानं पायलच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. ३० एप्रिलपर्यंत चौकशी पूर्ण करुन त्याचे रिपोर्ट जमा करण्याचे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. काय आहे हे प्रकरण जून २०२० मध्ये जामिया विद्यापीठातून एम.फिल केलेली विद्यार्थीनी सफूरा जरगर दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेली होती. त्या ठिकाणी झालेल्या वैद्यकीय चाचणीत ती प्रेग्नन्ट असल्याचं समोर आलं. यावर अभिनेत्री पायल रोहतगी तिच्या धर्माचा संदर्भ देत एक आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. पायलच्या या ट्वीटच्या विरोधात मुंबईतील एक वकील अली काशिफ खान यांनी मुंबईच्या अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर वकील अली काशिफ खान यांनी अंधेरी मेट्रोपोलिटन न्यायालयात डिसेंबर २०२० मध्ये या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि पायलवर गुन्हा दाखल करावा अशी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान महानगर दंडाधिकाऱ्यांनी म्हटलं की, पायल रोहतगीच्या ट्वीटनं मुस्लिम महिला आणि त्यांच्या संपूर्ण समुदायाचा अपमान केला आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माप्रती आस्था ठेवण्याचा आधिकार आहे आणि कोणालाही कोणत्याही दुसऱ्या धर्माचे रिती-रिवाज आणि नियम यांची खिल्ली उडवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पायच्या या ट्वीटची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे तिच्या विरोधातली ही कारवाई पुढे नेता येईल आणि ही चौकशी पोलिसांकडूनच व्हायला हवी. पायल रोहतगीच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावरून तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. एवढंच नाही तर ट्विटरनं तिचं अकाउंट सुद्धा सस्पेंड केलं होतं. तसेच पायलच्या विरोधात समाजिक कार्यकर्त्या लहर सेठी यांनीही राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cTAJUO