Full Width(True/False)

'नेत्यांच्या मागे असणाऱ्या गर्दीला लॉकडाऊनचे नियम नाही का?' केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

मुंबई: सध्या करोनामुळे देशात आणि राज्यातही खूपच बिकट परिस्थिती आहे. रोज अनेकांचा मृत्यू होत आहे तर अनेक ठिकाणी औषधं, बेड, ऑक्सिजन सिलेंडर यांचा तुटवडा आहे. करोनावर प्रतिबंध म्हणून सध्या राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ज्यामुळे गर्दी नियंत्रणात राहिल असं सरकारचं म्हणणं आहे. पण याच संदर्भात चित्रपट दिग्दर्शक यांची एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. राजकीय नेत्यांच्या मागे असणाऱ्या गर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर राज्यातील राजकीय नेत्यांबाबत एक पोस्ट लिहिली आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. केदार शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते,त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!' या आधी केदार शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत भारताला स्वातंत्र्य मिळूनही काहीही उपयोग झाला नसल्याचं म्हटलं होतं. आता ब्रिटिश असते तर निदान आरोग्य व्यवस्थातरी चांगल्या असत्या असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी पोस्ट करत लिहिलं, 'भविष्यात वीज/ गॅस प्रमाणे ऑक्सिजनचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको. स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण, दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वासही आपल्याला सहजासहजी उपलब्ध करून दिलेला नाही. ब्रिटिश हवे होते अजून काही वर्ष.. आता ते हवे होते म्हणजे... किमान या जगण्याच्या महत्वाच्या सोई तरी व्यवस्थित करून दिल्या असत्या!!!' असं म्हणत त्यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. सध्या देशाभरात करोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासन आणि त्यांच्या यंत्रणेवर जोरदार टीका केली जात आहे. अनेक मराठी कलाकारांनी करोना काळात कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेबाबत सरकारला दोषी ठरवलं आहे आणि यावरून टीकाही केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nnvG2L