मुंबई- करोनामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनादेखील करोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात आणि देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्यात आलेलं आहे. तरीही, बॉलिवूड कलाकारांमधील करोना संक्रमण वाढतच चाललं आहे. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि उत्कृष्ट अभिनेते यांना इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली होती. ते त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन झाले होते. परंतु, त्यांना श्वास घेण्यास अडचण वाटू लागण्याने त्यांना इस्पितळात भरती करावं लागलं आहे. 'रॉकस्टार', 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी', 'आर्टिकल 15' यांसारख्या अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते कुमुद मिश्रा यांना नुकतीच करोनाची लागण झाली होती. ते त्यांच्या करोनाग्रस्त आईला पाहायला इस्पितळात गेले असताना त्यांना करोनाची लागण झाल्याचं म्हटलं जातंय. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावं लागलं. सध्या ते एका प्रायव्हेट इस्पितळात भरती असून त्यांना ऑक्सिजन सपोर्ट लावावा लागला आहे. आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि डॉक्टर्सदेखील त्यांची योग्य ती काळजी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय संगीतकार श्रवण राठोड यांना करोनाची लागण झाली होती आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना करोनाचा गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाला होता. त्यात त्यांच्या शरीरात पूर्वीपासून अनेक आजार असल्याने डॉक्टरांसाठी त्यांना वाचवणं अशक्य झालं. त्यांच्या मृत्यूवर प्रीतम, सलीम मर्चन्ट, श्रेया घोषालसह अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलं होतं. यासोबतच अक्षय कुमार, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, कार्तिक आर्यन भूमी पेडणेकर या कलाकारांना देखील करोनाची लागण झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xlqIrI