मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत ६० आणि ७० च्या दशकांमध्ये धर्मेंद्र, राजेश खन्ना आणि या अभिनेत्यांच्या नावाची चर्चा होती. एकीकडे धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी अनुक्रमे अॅक्शनपटांमधून, रोमँटिक भूमिकांमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. तर दुसरीकडे जितेंद्र हे अभिनेते म्हणून उदयास येत होते, त्यांचा डान्स, त्यांचा पेहेराव आणि त्यांच्या अनोख्या अशा स्टाईलने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. ८० सिनेमांचे रिमेक करणारे ते एकमेव जितेंद्र यांनी त्यांच्या करीअरमध्ये जवळपास २०० हून अधिक सिनेमे केले आहेत. जितेंद्र यांनी त्यांच्या काळातील बहुतांश सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केले होते. भारतीय सिनेमाच्या इतिहासामध्ये ८० सिनेमांच्या रिमेकमध्ये काम करणारे जितेंद्र हे एकमेव अभिनेते आहेत. खरे तर त्या काळात प्रेक्षकांना रिमेक सिनेमे पाहण्याची फारशी सवय नव्हती, अशा काळात जितेंद्र यांनी सिनेमांच्या रिमेकमध्ये काम केले. जितेंद्र यांचा अभिनय आणि त्यांची स्टाईलने त्या काळातील पिढीच्या पिढी भारावून गेली होती. त्यांची स्टाईल अनेकांनी फॉलो केली होती. विशेषतः तरुण वर्गांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ होती. त्यांचे कपडे, त्याला मँचिंग बूट आणि केसांची स्टाईल हे सर्व तेव्हाच्या पिढीने आत्मसात केले होते. अभिनयासाठी कधीच मिळाला नाही पुरस्कार जितेंद्र यांनी ज्या ज्या सिनेमांत काम केले, त्या सर्वच भूमिका जीव ओतून साकारल्या होत्या. त्या भूमिका लोकप्रियही झाल्या परंतु तरीदेखील जितेंद्र यांना अभिनयासाठी कधीच पुरस्कार मिळाले नाहीत. असे का याचे उत्तर अद्यापही अनुत्तरीतच आहे. लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड अनेकदा मिळालेजितेंद्र यांच्याबाबतीत एका गोष्टीचे कायम आश्चर्य वाटते की, ज्या अभिनेत्याला त्याच्या करिअरमध्ये अभिनयासाठी कधीच पुरस्कार मिळाले नाही, अशा अभिनेत्याला अनेकदा लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार कसे दिले गेले? जितेंद्र यांना सर्वप्रथम २००० मध्ये लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर त्यांना एकामागोमाग एक पाच वेळा हा पुरस्कार मिळाला. २००३ मध्ये त्यांना फिल्मफेअरने लाइफ टाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड दिले तेव्हा ते स्टेजवर मनोगत व्यक्त करताना खूपच भावुक झाले होते. जितेंद्र यांचा मार्ग खडतर होता ज्या काळात बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले होते. त्याकाळात जितेंद्र यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या दिग्गजांबरोबर त्यांची स्पर्धा होती. त्यांचा मार्ग खडतर होता परंतु या दिग्गज अभिनेत्यांचे जितेंद्र यांनी कधीच टेन्शन घेतले नाही, त्यांनी कायम आपला फोकस सिनेमा आणि अभिनयावरच ठेवला होता. त्यामुळेच जनमानसात जितेंद्र लोकप्रिय झाले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cTU20c