मुंबई: टीव्हीवरील लोकप्रिय जोडी आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नुकताच त्यांचा एका म्यूझिक अल्बमसुद्धा रिलीज झाला आहे. त्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे. अशातच रुबीनाच्या संदर्भात एक मोठं वृत्त समोर आलं आहे. एका वेबसाइटनं रुबीनाचा मोबाइल नंबर इंटरनेटवर लीक केला. ज्यामुळे तिला अनोळखी कॉल आणि मेसेज येऊ लागले होते. याची माहिती रुबीनाचा पती अभिनव शुक्लानं त्याच्या सोशल मीडियावरून दिली आहे. अभिनव शुक्लानं एक ट्वीट करताना लिहिलं, 'अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे पर्सनल मोबाइल नंबर अवैध पद्धतीनं शेअर करणारी एक वेबसाइट आज आम्ही बंद केली. माझ्या बऱ्याच इंजिनिअर मित्रांनी यासाठी मला मदत केली आहे. धन्यवाद मित्रांनो. इंजिनयर्सना टक्कर देणं महागात पडू शकतं.' स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनवनं सांगितलं, जेव्हा रुबीना अनोळखी नंबर्सवरून कॉल आणि मेसेज यायला लागले त्यावेळ मला हे समजलं. एका वेबसाइटनं रुबीनाचा नंबर लीक केला होता ज्यामुळे जगभरतून तिला मेसेज येऊ लागले होते. त्यानंतर मी माझ्या काही इंजिनिअर मित्रांची मदत घेऊन ही वेबसाइट तीन दिवसांत बंद केली. आता ही वेबसाइट बंद झाली आहे मात्र या वेबसाइटवर जवळपास १०० पेक्षा जास्त कलाकारांचे नंबर होते. त्यानं आता जर ही वेबसाइट परत सुरू केली तर मी क्राइम ब्रांचला कळवणार आहे. दरम्यान इंटरनेटवर पर्सनल नंबर लीक झाल्यानंतर रुबीनाला जगभरातून अनोळखी नंबरचे अनेक कॉल्स आणि मेसेज यायला सुरूवात झाली होती. ज्यामुळे तिला बराच मनस्तापही सहन करावा लागला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g8Nb53