नवी दिल्लीः हँडसेट निर्मता कंपनी Samsung ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन amsung Galaxy Quantum 2 ला लाँच केले आहे. या लेटेस्ट हँडसेटला कंपनीने SK Telecom सोबत मिळून बाजारात उतरवले आहे. या फोनच्या खास वैशिष्ट्ये मध्ये इनफिनिटी-ओ डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि स्नॅपड्रॅगन 855+ चिपसेट आणि क्वांटम क्रिप्टोग्राफी टेक्नोलॉजी दिली आहे. जाणून घ्या या फोनविषयी सर्वकाही. वाचाः Samsung Galaxy Quantum 2 चे फीचर्स या फोनला अँड्रॉयड ११ वर आधारित वन यूआयवर काम करतो. फोनमध्ये ६.७ इंचाचा एचडी प्लस (1,440x3,200 पिक्सल) डायनामिक एमोलेड 2X डिस्प्ले दिला आहे. स्पीड आणि मल्टिटास्किंग साठी Qualcomm Snapdragon 855+ SoC चा वापर करण्यात आला आहे. हँडसेट मध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेजला १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. वाचाः सॅमसंगच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत १२ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर, आणि ५ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेन्सर दिला आहे. कॅमेरा सेटअप 10x डिजिटल झूम आणि OIS सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंट मध्ये १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500 mAh ची बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीने या फोनला तीन व्हेरियंट मध्ये उतरवले आहे. व्हाइट, ग्रे आणि लाइट वॉयलेटमध्ये. नवीन सॅमसंग गॅलेक्सी क्वॉटंम २ ची दक्षिण कोरियात किंमत KRW 699,600 (जवळपास ४७ हजार ७०० रुपये) आहे. ही किंमत ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची आहे. या फोनला अन्य इंटरनॅशनल मार्केटमध्ये Samsung Galaxy A82 5G च्या नावाने उतरवले जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32dR0xS