नवी दिल्लीः भारतात कोविड १९ च्या केसेस अचानक वाढल्या आहेत. करोनाला आळा घालण्यासाठी लस सेंटर उभारण्यात आले आहेत. सरकारची वॅक्सिनेशन मोहीम तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यात ४५ हून जास्त वयाच्या व्यक्तीला लस दिली जात आहे. खासगी हॉस्पिटलवर एका कोविड १९ लसीची किंमत २५० रुपये आहे. तर सरकारी रुग्णालायत याला फ्री मध्ये दिले जाते. वाचाः भारतात दोन प्रकारच्या Covaxin आणि Covishield लसीला मंजुरी देण्यात आली आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लसीच्या सेंटरचा पत्ता शोधण्यात अडचण येत आहे. त्यामुळे ही खूपच सोपी प्रोसेस आहे. जाणून घ्या डिटेल्स. कसे शोधाल CoVID-19 व२क्सीनेशन केंद्र Covaxin आणि Covishield चा वापर भारतात वॅक्सीनेशनच्या रुपात केला जात आहे. Covaxin ला हैदाराबाद येतील भारत बायोटेक कडून भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR) आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) च्या मदतीने बनवण्यात आले आहे. वाचाः तर Covishield ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कडून विकसीत करण्यात आले आहे. याचे निर्माण सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII)कडून केले जात आहे. आपल्याजवळ COVID-19 वॅक्सीनेशन केंद्र शोधण्यासाठी यूजर्सला COWIN पोर्टल किंवा MapMyIndia वेबसाइट वर जावे लागेल. खाली दिलेल्या स्टेप्टस फॉलो करा. सर्वात आधी cowin.gov.in वर जा. मग होम पेजच्या खाली स्क्रॉल करा. या ठिकाणी तुम्हाला Find Your Nearest Vaccination Center चा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायाखाली भारताचा नकाशा दिला आहे. या ठिकाणी तुम्ही प्लस किंवा मायनेस ला सिलेक्ट करून आपले क्षेत्र सिलेक्ट करा. क्षेत्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे वॅक्सिनेशन सेंटर आहे हे दिसेल. सर्च करण्यासाठी तुम्हाला करंट लोकेशनच्या टॅबवर आपले क्षेत्र टाकावे लागेल. त्यानंतर GO वर टॅप करावे लागेल. या लिस्ट मध्ये तुम्हाला हॉस्पिटल्स आणि वॅक्सीनेशन सेंटरची माहिती दिली आहे. या ठिकाणी संपूर्ण पत्ता दिला आहे. त्यानंतर गेट डायरेक्शन बटनवर टॅप करून पोहोचता येईल. वाचाः MapMyIndia पोर्टल वरून शोधा वॅक्सीनेशन सेंटर सर्वात आधी तुम्हाला यासाठी MapmyIndia वेब पोर्टलवर जा. त्यानंतर याच्या अॅपला डाउनलोड करा. साइटच्या सर्व फीचर्सचे अॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर करावे लागणार आहे. एकदा लॉगइन झाल्यानंतर सर्च बॉक्स मध्ये आपले करंट लोकेशन टाका. आपला पत्ता टाका. यानंतर Vaccination Centres चा पर्याय टॅप करा. जो लेफ्ट मेन्यू दिला आहे. यानंतर तुम्हाला एक लिस्ट दिली जाईल. वॅक्सिनेशन सेंटरसी होणार आहे. हे सर्व पत्ते इंजेक्शन लोकांसोबत मॅपवर पिन असतील. यानंतर गेट डायरेक्शनवर टॅप करा. असे केल्यानंतर तुम्हाला वॅक्सीनेशन सेंटरच्या लोकेशनची माहिती होईल. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dx7kyZ