Full Width(True/False)

माझ्या सपाट पोटाला सेक्सी म्हणणारे आता मात्र...;ट्रोल करणाऱ्यांना प्रेग्नंट उर्मिला निंबाळकरचं सडेतोड उत्तर

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने काही दिवसांपूर्वी तिच्या चाहत्यांना प्रेग्नंट असल्याचे जाहीर केले होते. हे जाहीर करताना तिने आणि तिच्या नव-याने बेबी बंपसह फोटो पोस्ट केले होते. तिच्या या बोल्ड फोटोशूटमुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले होते. परंतु उर्मिलाने तिला ट्रोल करणा-यांचा एक पोस्ट करत खरपूस समाचार घेतला आहे. उर्मिलाने काही दिवसांपूर्वीच प्रेग्नंट असल्याची गुड न्यूज पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तिने ही पोस्ट करत तिचे बेबी बंपमधले पोस्ट केले होते. या फोटोमध्ये तिचा नवराही होता. अनेकांनी तिचे हे फोटो लाईक करत तिला शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी तिला अशा अवस्थेत फोटो शेअर केल्याने तिला खूपच ट्रोल केले होते. या ट्रोलर्सना उर्मिलाने आणखी एक इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे चोख उत्तर दिले आहे. उर्मिलाने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'माझ्या सपाट पोट आणि बारीक कंबरेला सुंदर दिसतेस, सेक्सी दिसते म्हणणाऱ्या सर्वांना, जगातील सर्वात नैसर्गिक आणि आनंदाची उधळण करणाऱ्या गोंडस गर्भारपणातील वाढलेल्या पोटाला पाहिल्यावर ‘प्रदर्शन करतेय’ म्हणणाऱ्या सर्व पुढारलेल्या पुरुष आणि दुर्दैवानं स्त्रियांना माझा सलाम आहे. तोपर्यंत मातृत्वाच्या प्रवासातील, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं चालूच राहिल. ' उर्मिलाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये अशी करणाऱ्यांना ना आई शपथ... रांगेत उभं करून गोळ्या घातल्या पाहिजेत! कोण आणि का असतात ही लोकं? असो तुझ्या गोंडस गर्भारपणात यांचा उल्लेख ही नको! तुला खूप सारं प्रेम! अशी होती उर्मिलाची पहिली पोस्ट उर्मिलाने एक एप्रिल रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बेबी बंपसह फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तिचा नवराही सोबत आहे. हे फोटो पोस्ट करताना 'आम्ही प्रेग्नंट आहोत' असे लिहिले होते. तसेच 'हे एप्रिल फूल नाही' असे ही तिने नमूद केले होते. एक एप्रिल रोजीच तिने हे फोटो पोस्ट केल्याने अनेकांनी हे एप्रिल फूल असल्याचीच प्रतिक्रिया दिली होती. तर अनेकांनी तिच्या या अशा फोटोंबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत ट्रोलिंग केले. या ट्रोलिंगमध्ये नेटक-यांनी असभ्य भाषेत प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, उर्मिलाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘दुहेरी’ ही तिची मालिका विशेष गाजली होती. तिने ‘दिया और बाती हम’,’मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकांमध्येही काम केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PY0ryF