Full Width(True/False)

Exclusive: धर्मा प्रोडक्शनने कार्तिक आर्यनला केलं ब्लॅकलिस्ट

मुंबई: वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असणे अभिनेता कार्तिक आर्यनला चांगलेच महागात पडले आहे. कारण बॉलिवूडमधील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे प्रॉडक्शन हाऊस असलेल्या धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या आगामी ' ' या सिनेमातून त्याला काढून टाकले आहे. इतकेच नाही तर धर्मा प्रॉडक्शनने त्याला बॅनही केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्तिक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. मध्यंतरी धर्मा प्रॉडक्शनच्या शरण शर्मा दिग्दर्शन करत असलेल्या आगामीत सिनेमात कार्तिक असणार असल्याचं ऐकण्यात आलं होतं. पण नंतर करण जोहरने यासंबंधी ट्वीट करत कोणतंही कास्टिंग न झाल्याचं स्पष्ट केलं होतं. या सिनेमात तृप्ती डिमरी अभिनेत्री असण्याबद्दलही बोललं गेलं होतं. यानंतर कार्तिकच्या नावाची 'धमाका' सिनेमावरून चर्चा झाली. कार्तिकच्या टीमने सांगितले होते की, एका कोरियन सिनेमाचा रिमेक असलेला हा सिनेमा ३० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. धमाका सिनेमा नेटफ्लिक्सने १३५ कोटी रुपयांना विकत घेतला. ही बातमी समोर आल्यानंतर नेटफ्लिक्सने हा व्यवहार यापेक्षा कमी किंमतीमध्ये झाल्याचा खुलासा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'दोस्ताना २' मध्ये कार्तिकने आपलं महत्त्व वाढवण्यासाठी या साऱ्या गोष्टी केल्याचं म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये तशी दबक्या आवाजात चर्चाही सुरू आहे. आता कार्तिकला 'दोस्ताना २' सिनेमातून काढून टाकले आहे हे जवळपास स्पष्ट झालं आहे. याशिवाय यापुढे धर्मा प्रोडक्शनच्या एकाही सिनेमात कार्तिक आर्यनला घेण्यात येणार नसल्याचंही पूर्णपणे निश्चित आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकचे महत्त्व वाढवण्यामध्ये 'दोस्ताना २' चा मोठा वाटा आहे. जवळपास दिड वर्षांपूर्वी कार्तिकने या सिनेमाची स्क्रिप्ट वाचली होती आणि त्याला होकार दिला होता. त्यानंतर लॉकडाउन लागल्याने सिनेमाच्या कामाला खिळ बसली. काही दिवसानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर कार्तिकला या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तारखा देण्यासाठी विचारणा झाली. तेव्हा कार्तिककडून त्याबाबत टाळाटाळ होऊ लागली. अनेकदा त्याच्याशी संपर्क साधून त्याच्याकडून तारखा घेतल्या. त्यानंतर २० दिवस या सिनेमाचे चित्रीकरणही झाले. परंतु तेव्हा देखील कार्तिकने काही ना काही कारण काढून काम करण्यासाठी पुन्हा टाळाटाळ सुरू केली. अखेर कार्तिककडून कोणतेच सहकार्य मिळत नसल्याने आणि एकूण हे प्रकरण डोईजड होत असल्याने धर्मा प्रॉडक्शनने 'दोस्ताना २' मधून कार्तिकला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाहीतर यापुढे त्याच्यासोबत काम करणार नाही असेही जवळपास स्पष्ट झालं आहे. कार्तिकचे वागणे अव्यावसायिक आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शनवर कायमच घराणेशाहीचे आरोप केले जातात. या पार्श्वभूमीवर 'दोस्ताना २' या सिनेमातून एक नवोदित अभिनेता सिनेमासृष्टीमध्ये येत आहे. त्याला कोणतीही सिनेमाची पार्श्वभूमी नाही. तसेच कार्तिकलाही कोणतीही सिनेमाची कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. या सिनेमाच्या निमित्ताने धर्मा प्रॉडक्शनवर होणारे हे आरोप खोडून टाकण्यााची नामी संधी होती. परंतु कार्तिकच्या या अव्यवसायिक वागण्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने कठोर कारवाई करावी लागल्याची माहिती सुत्रांनी दिली. जान्हवीसोबतही कार्तिकला होता प्रॉब्लेम 'दोस्ताना २' या सिनेमात जान्हवी कपूरही काम करत आहे. तिच्यासोबत कार्तिकचे काही व्यक्तिगत वाद होते. सुरुवातील त्याने हे वाद बाजूला ठेवत २० दिवसांचे चित्रीकरण केले होते. परंतु नंतर त्याने हे व्यक्तिगत वाद कामाच्या ठिकाणी आणले. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ggTeom