मुंबई : ज्येष्ठ अभिनेता यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी अशी स्टाइल निर्माण केली. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये आपलं नृत्यकौशल्य दाखवत प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य केले होते. अशा या लोकप्रिय अभिनेत्याचा जन्म ७ एप्रिल १९४२ मध्ये पंजाब येथील अमृतसरमध्ये झाला. जितेंद्र यांचे खरे नाव रवी कपूर आहे. लहानपण गेले चाळीत जितेंद्र यांचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे पालक मुंबईला आले. दक्षिण मुंबईतील गिरगावातील श्याम सदन चाळीत त्यांचे वास्तव्य होते. तिथेच जितेंद्र यांनी आपल्या आयुष्यातील २० वर्षे घालवली. खडतर संघर्ष जितेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरला १९५९ मध्ये सुरुवात केली. त्यांचा पहिला सिनेमा होता 'नवरंग.' या सिनेमात त्यांची खूपच लहान भूमिका होती. त्यानंतर जितेंद्र यांनी सिनेमांत काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. 'नवरंग'नंतर सिनेमात काम मिळवण्यासाठी जितेंद्र यांना पाच वर्षे अथक प्रयत्न करावे लागले होते. पण हिंमत न हारता त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर १९६४ मध्ये 'गीत गाया पत्थरों नें' या सिनेमात त्यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर जितेंद्र यांनी मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडमध्ये त्यांनी स्वतःची अशी स्टाइल निर्माण केली. जितेंद्र यांनी जवळपास २०० हून अधिक सिनेमांत काम केले. त्यातील अनेक सिनेमे सुपरहिट झाले होते. जितेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये नामवंत निर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्रींसोबत काम केले. जितेंद्र यांचे ' परिवार', 'जीने की राह', 'वारिस', 'खिलौना', 'हमजोली', 'बिदाईं', 'धर्मवीर', 'जानी दुश्मन' 'हिम्मतवाला' असे अनेक सिनेमे सुपरहिट झाले होते. हेमामालिनींसोबत लग्न करणार होते? जितेंद्र व्यक्तिगत आयुष्यातही अनेकवेळा चर्चेत आले होते. जितेंद्र आणि हेमामालिनी हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा त्याकाळात होती. 'वारिस' आणि 'गहरी चाल' या सिनेमांमध्ये जितेंद्र आणि हेमामालिनी यांनी एकत्र काम केले होते. तेव्हा या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.त्यामुळेच या दोघांनी चैन्नईत लग्न करणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या. खरे तर जितेंद्र यांचे पहिले लग्न शोभा यांच्यासोबत झालेले होते. इतकेच नाही तर जितेंद्र लग्न करणार असल्याची कुणकुण शोभा यांना लागली. तेव्हा त्या चैन्नईला पोहोचल्या आणि लग्न थांबवले अशा बातम्याही समोर आल्या होत्या. कालांतराने धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांचे लग्न झाले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Q6IdL9