नवी दिल्लीः Flipkart वर Mobiles Bonanza Sale ची सुरुवात झाली आहे. हा सेल ११ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचे स्मार्टफोन बेस्ट ऑफर आणि डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. सेलमध्ये युजर्संना नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा ऑप्शन दिला जात आहे. जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर किती मिळणार डिस्काउंट. वाचाः iQOO3 iQOO चा हा पॉवरफुल स्मार्टफोन या सेलमध्ये १३ हजार रुपयांच्या सूट सोबत उपलब्ध आहे. डिस्काउंट नंतर या फोनची किंमत ३७ हजार ९९० रुपयाऐवजी २४ हजार ९९० रुपये झाली आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या फोनला एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी केल्यास १६ हजार ५०० रुपयापर्यंत फायदा मिळू शकतो. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसरच्या या फोनमध्ये 4440mAh ची बॅटरी दिली आहे. ५५ वॉटच्या सुपर फ्लॅश चार्ज सपोर्ट करते. वाचाः iPhone 12 Mini जबरदस्त फीचर्स असलेल्या आयफोनला या सेलमध्ये तुम्ही ६९ हजार ९९० रुपयाऐवजी ५९ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. ६४ जीबी व्हेरियंटच्या आयफोनला या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी केल्यास तुम्हाला १६ हजार ५०० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. iPhone 12 Mini मध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप आणि फ्रंट मध्ये १२ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा मिळतो. वाचाः Realme X7 Pro 5G फ्लिपकार्ट मोबाइल्स बोनांजा सेलमध्ये हा फोन २७ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसोबत लिस्ट आहे. फोनवर कंपनी २ हजार रुपयांचा प्रीपेड डिस्काउंट देत आहे. या ५जी फोनला तुम्ही फ्लिपकार्टच्या स्मार्ट अपग्रेड स्कीम अंतर्गत खरेदी करू शकता. या स्कीम मध्ये फोनला ९ हजार रुपये कमी देऊन फोन खरेदी करू शकता. फोनला एक्सचेंज ऑफर मध्ये १८ हजार ५०० रुपयांपर्यंत बेनिफिट मिळू शकते. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 120Hz चा सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 1000+ प्रोसेसर दिला आहे. वाचाः Samsung Galaxy A51 फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन २० हजार ९९९ रुपयांच्या किमतीसोबत लिस्ट आहे. फोनला एक्सचेंज ऑफर मध्ये घेतल्यास १६ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये तुम्ही ३५०० रुपयांच्या सुरुवातीला नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करू शकतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. रियर पॅनेलवर तुम्हाला ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप आणि ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mxHmPV