नवी दिल्लीः करोना महामारीने केवळ जगाच्या आरोग्यावर परिणाम केला नाही तर अनेक देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा याचा मोठा परिणाम झाला आहे. असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. काहींनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. लॉकडाउन हटवल्यानंतर कंपन्या आपले झालेले नुकसान भरपाई करू शकल्या नाहीत. त्यामुळे करोना काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत ते नोकरी शोधत आहेत. वेगवेगळ्या वेबसाइटवर जाऊन नोकरी शोधत आहेत. परंतु, अनेकदा या ठिकाणी त्यांना धोका मिळत आहे. असाच काही प्रकार Linkedin यूजर्स सोबत होताना दिसत आहे. सायबर क्रिमिनल्स नोकरी शोधणाऱ्या बेरोजगारांन लक्ष्य करीत आहेत. वाचाः eSentire सिक्योरिटी फर्म च्या माहितीनुसार, सायबर अटॅकर्सच्या एका ग्रुपने नोकरी शोधणाऱ्या युजर्संना टार्गेट करणे सुरू केले आहे. या ग्रुपचे नाव गुल्डन चिकन्स आहे. यांनी युजर्संना धोका देण्यासाठी एक नवीन पद्धत अवलंबवली आहे. हे युजर्संच्या डिव्हाइसवर नोकरी देण्याची लिंक पाठवून त्यांची फसवणून करीत आहेत. रिपोर्ट मध्ये म्हटले की, ग्रुप युजर्सला त्याच पगारात नोकरी देण्याचे अमिष देत आहेत. वाचाः eSentire च्या रिसर्च टीम ने म्हटले की, जर LinkedIn वर कोणी मेंबर मोठ्या पोस्टवर असल्यास त्या व्यक्तीला सेम त्याच पोस्टची लिंक पाठवली जाते. मग त्याच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस टाकले जाते. या व्हायरस नंतर बँकिंग डिटेल्स सोबत तुमची खासगी माहिती चोरी केली जाते. eSentire चे सीनियर डायरेक्टर रॉब Mcleod ने सांगितेल की, करोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. त्यामुळे त्यांची फसवणूक केली जात आहे. वाचाः या प्रकरणी Linkedin ने म्हटले की, ते मॅन्यूअल फेक अकाउंट्सची ओळख पटवली जात आहे. त्यांना कायमस्वरूपीसाठी ब्लॉक केले जात आहे. लाखो लोक या प्लॅटफॉर्मवर येऊन नोकरी शोधत असता. जो तुमच्यासाठी चॅटिंग करीत आहे. त्याने तुमची प्रोफाइल उघडली आहे ती ओरिजनल आहे की, फेक हे एकदा तपासून पाहा. युजर्संसोबत आम्ही सुद्धा या अकाउंट्सवर लक्ष देत आहोत. त्यांना ब्लॉक करीत आहोत. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OsEVS5