मुंबई- छोट्या पडद्यावरील '' ही लोकप्रिय मालिका मागील १० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना अत्यंत जवळची वाटतात. मालिकेने अनेकदा टीआरपीमध्ये टॉप- ५ मध्ये स्थान मिळवलं आहे. असं असलं तरीही प्रेक्षक मालिकेतील दयाबेनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने २०१७ साली मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र अजूनही ती मालिकेत परत आलेली नाही. त्यानंतर दिशाने ती मालिकेत परतणार नसल्याचं म्हटलं होतं. आता मालिकेत नवीन कधी येणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. मालिकेत नवीन दयाबेनला पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या एका चाहत्याने मालिकेच्या दिग्दर्शकाला याबद्दल ट्विटरवर प्रश्न विचारला. त्यावर मालिकेचे दिग्दर्शक यांनीही मजेशीर उत्तर दिलं आहे. चाहत्याने ट्विट करत त्यांना विचारलं, 'कृपया तुम्ही नवीन दयाला घेऊन या. इतका वेळ वाट बघून काही फायदा होईल का. तुम्हीच विचार करा. बिचारे आम्ही कधीपासून दयाबेनला पाहण्यासाठी वाट बघत आहेत.' यावर मालिकेच्या दिग्दर्शकांनी अत्यंत गमतीशीर उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, 'मी यावर जास्त बोललो तर माझ्याजागी दुसरा दिग्दर्शक घेऊन येतील. हे सगळं माझ्या हातात नाहीये. मी फक्त मालिकेचं दिग्दर्शन करतो. मी मालिकेच्या आणि पात्रांच्या संबंधित कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही. पण जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं.' मालव यांचं हे उत्तर ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. कुणालाही त्यांच्या अशा उत्तराची अपेक्षा नसल्याने सगळ्यांनी या ट्वीटवर हसण्याच्या प्रतिक्रिया दिल्या. परंतु,प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मालिकेचे निर्माते खरंच नवीन दयाबेनला आणणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. शिवाय नवीन दयाबेन कोण असणार याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PzvZet