नवी दिल्लीः स्मार्टफोनला भारतात लवकरच लाँच केला जाणार आहे. लाँच आधीच याच्या किंमतीची माहिती उघड झाली आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ७० हजार रुपये असणार आहे. याची माहिती Gadgets 360 वर आली आहे. हा नवीन स्मार्टफोन Mi 11 Pro, Mi 11 Pro आणि Mi 11 Lite 5G सोबत या आठड्याच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. चीनच्या लाँचिंग नंतर भारतात याच्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली आहे. Xiaomi ने या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी Samsung GN2 कॅमेरा, 2K अमोलेड डिस्प्ले, बॅक पॅनलवर सेकेंडरी डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्र्रॅगन 888 प्रोसेसर दिला आहे. वाचाः याप्रकरणी एका व्यक्तीने Gadgets 360 ला ही माहिती दिली आहे. भारतीय मार्केटमध्ये ७० हजार रुपये याची सुरुवातीची किंमत असणार आहे. हा सर्वात महाग स्मार्टफोन असणार आहे. चीनची टेक कंपनी मी ११ अल्ट्रा फोनला Superphone म्हणून प्रमोट सुरू केले आहे. Gadgets 360 ने हेही म्हटले की, Mi सीरीज अन्य फ्लॅगशीप फोनप्रमाणे शाओमी मी अल्ट्राचे प्रोडक्शन स्थानिक लेवलवर करणार नाही. सुरुवातीच्या युनिट्सला चीनमधूनच निर्यात केले जाणार आहे. यामुळे या फोनवर इंपोर्ट ड्यूटी वाढणार आहे. वाचाः मी ११ अल्ट्रा स्मार्टफोनला चीनमध्ये लाँच केले गेले आहे. Mi 11 Ultra च्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मॉडलची किंमत जवळपास ६७ हजार रुपये आहे. तर १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेज मॉडलची किंमत ७२ हजार ६०० रुपये आहे. तर याच्या टॉप ऑफ द मॉडलची किंमत ७८ हजार २०० रुपये आहे. मी ११ अल्ट्राच्या १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मॉडलची किंमत यूरोपमध्ये १ लाख ३ हजार ४०० रुपये आहे. वाचाः Xiaomi ने या फोनमध्ये हाय एन्ड स्पेसिफिकेसन दिले आहे. ज्यात ६.८१ इंचाचा 2K WQHD+ (3,200× 1,440 पिक्सल) ई4 एमोलेड प्रायमरी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा Samsung GN2 प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये १.१ इंचाचा (126x294 पिक्सल) अमोलेड सेकेंडरी टच डिस्प्ले दिला आहे. रियर कॅमेरामधून सेल्फी घेता येऊ शकते. याशिवाय यात ५ जी सपोर्ट, ६७ वायर्ड व वायरलेस चार्जिंग आणि आयपी ६८ सर्टिफिकेशन बिल्ड दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3unC4sY