नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आपल्या C-सीरीजला वाढवत Realme C20, C21 आणि C25 स्मार्टफोनला लाँच केले आहे. कंपनीने ला सिंगल स्टोरेज व्हेरियंट मध्ये लाँच केले आहे. यात 2GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळणार आहेत. याची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. यात एक मिलियन ग्राहक या फोनला ६ हजार ७९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकतात. या फोनला पहिला सेल १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. वाचाः ला कंपनीने दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यात 3GB+32GB स्टोरेजचा फोन तुम्हाला ७ हजार ९९९ रुपये आणि 4GB+64GB चा फोन ८ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहे. या स्मार्टफोनला ग्राहक १४ एप्रिलला दुपारी १२ वाजता खरेदी करू शकता. याशिवाय, च्या 4GB+64GB व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये आणि 4GB+128GB व्हेरियंटची किंमत १० हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. तुम्ही या तिन्ही स्मार्टफोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोरवरून खरेदी करू शकतो. वाचाः Realme C20 चे फीचर्स हा स्मार्टफोन कूल ब्लू आणि कूल ग्रे कलर मध्ये लाँच करण्यात आले आहे. यात तुम्हाला ६.५ इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. octa-core MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डची सुविधा मिळणार आहे. या फोनमध्ये रियरमध्ये ८ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा दिला आहे. नाइट फोटोग्राफी, पोर्ट्रेट मोड आदी सारखे अनेक मोड्स सपोर्ट करते. याशिवाय, फ्रंट मध्ये ५ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा दिला आहे. पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. Realme C20 स्मार्टफोन Android 10 वर बेस्ड RealmeUI वर चालतो. वाचाः Realme C21 ची फीचर्स या फोनमध्ये तुम्हाला Realme C20 च्या प्रमाणे डिस्प्ले, प्रोसेसर आणि बॅटरी चांगली मिळू शकते. स्टोरेज मध्ये हे वेगळे आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा B&W लेंस दिला आहे. याशिवाय, फ्रंट मध्ये या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा दिला आहे. फोनला क्रॉस ब्लॅक आणि क्रॉस ब्लू कलर मध्ये लाँच केले आहे. वाचाः Realme C25 चे फीचर्स Android 11 वर बेस्ड Realme UI 2.0 वर काम करणारा या स्मार्टफोन मध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येतो. यात तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यात तुम्हाला १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर कॅमेरा मिळणार आहे. Realme C25 स्मार्टफोन MediaTek G70 Soc प्रोसेसर दिला आहे. यात ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनला तुम्ही वॉटरी ग्रे आणि वॉटरी ब्लू कलर मध्ये खरेदी करू शकता. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PCYdFb