मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी सोशल नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये करिअर करत नसतानाही तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्गसुद्धा आहे. अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतचं तिने चाहत्यांसाठी एक प्रश्नोत्तरांचं सेशन ठेवलं होतं. ज्यात तिनं एका प्रश्नाचं उत्तर देताना तिनं पती तिचा आवडता सेलिब्रेटी नसल्याचंही सांगितलं आहे. नुकत्याच घेतलेल्या एका सेशनमध्ये मीरा राजपूतला तिच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले आणि विशेष म्हणजे मीरानं यातील बऱ्याच चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी मीराला तिच्या आवडत्या सेलिब्रेटी कोण आहे? असा प्रश्न विचारला यासोबतच तिला शाहिद कपूर आणि असे दोन पर्याय देण्यात आले होते. यावेळी सर्वांना वाटत होतं की, ती शाहिदचं नाव घेईल पण तिनं एबी डिविलियर्सचं नाव घेत सर्वांनाच चकित केलं. मागच्या काही काळापासून आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे मीरा राजपूत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहिली आहे. ती नेहमीच सोशल मीडिया स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच प्रिंटेड स्विमसूटमधील तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल सुद्धा झाले होते. मीरा फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक आहे. शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो लवकरच 'जर्सी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकुर आणि पंकज कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटासाठी शाहिदनं बरीच मेहनत घेतली आहे. या चित्रपटाची कथा एका अशा व्यक्तीवर आधारित आहे. जो एक अयशस्वी क्रिकेटर आहे पण त्याच्याकडे खूप कौशल्य आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uz2Rm8