Full Width(True/False)

Samsung Galaxy A52 5G लवकरच भारतात करणार एन्ट्री, BIS वर झाला लिस्ट

नवी दिल्लीः Samsung लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन Galaxy A52 5G ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. ९१ मोबाइल्सच्या एका रिपोर्ट नुसार, या फोनला आता ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच बीआयएस वर पाहिले गेले आहे. सॅमसंगच्या या अपकमिंग स्मार्टफोनचे मॉडल नंबर SM-A526B/DS आहे. हा फोन गेल्या महिन्यात युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. याच्या इंडियन व्हर्जन मध्ये तेच फीचर मिळणार आहेत जे युरोपमधील मॉडल मध्ये ऑफर करण्यात आले होते. वाचाः चे फीचर फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०.९ आहे. या फोनमध्ये 120Hz चे रिफ्रेश रेट सोबत येते. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 750G चिपसेट दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड One UI 3.1 वर काम करतो. या फोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 4500mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. कनेक्टिविटी साठी या फोनमध्ये सर्व स्टँडर्ड ऑप्शन दिले आहेत. भारतात याची किंमत ३५ हजार रुपयांच्या जवळपास आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sSYdiI