नवी दिल्लीः स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन इंडियावर 7000mAh बॅटरीच्या या फोनवर मोठी सूट सोबत खरेदी करता येऊ शकते. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळते. जाणून घ्या फोनची किंमत आणि त्याची खास वैशिष्ट्ये. वाचाः Samsung Galaxy M51 ची किंमत आणि ऑफर्स Samsung Galaxy M51 च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २२ हजार ९९९ रुपये, तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे हा फोन खरेदी केल्यास १५०० रुपयांची सूट मिळणार आहे. याशिवाय, हँडसेटवर नो कॉस्ट ईएमआय ऑफर सुद्धा आहे. फोनला १२ हजार ७०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा मिळते. वाचाः Samsung Galaxy M51 चे फीचर्स Samsung Galaxy M51 मध्ये ६.७ इंचाचा एसअमोलेड प्लस इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम दिली आहे. तसेच १२८ जीबीचा पर्याय दिला आहे. फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. हँडसेटमध्ये २.२ गीगाहर्ट्ज क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर दिला आहे. Samsung Galaxy M51 फोनमध्ये 7000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम सोबत येते. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियरवर १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. कनेक्टिविटीसाठी सॅमसंगच्या या फोनमध्ये यूएसबी टाइप सी, ब्लूटूथ, वायफाय, ३.५ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहेत. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39HAlXC