मुंबई: बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन. स्वतःच्या वयाच्या कलाकारांपेक्षा सोशल मीडियावर जरा जास्तच सक्रिय आहेत. ते नियमितपणे ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असतात. पण मागच्या काही दिवसांमधील अमिताभ बच्चन यांच्या ट्वीट्सनी मात्र युझर्सना गोंधळात टाकलं आहे. नुकत्याच एका ट्वीटमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुलगा आणि अभिनेता याला त्याच्या 'द ' चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत पण या ट्वीटनेही युझर्सच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या एका ट्वीटमध्ये, गुरुवारी म्हणजेच ८ एप्रिलला त्याचा चित्रपट वेब प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर रिलीज होणार असल्याची माहिती दिली. संध्याकाळी ७.३० हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. अभिषेकच्या याच ट्वीटवर रिप्लाय करताना अमिताभ यांनी लिहिल, 'लक्षात आहे भैय्यू WHTCTW' याच ट्वीटसोबत त्यांनी ३ हार्ट इमोजीसुद्धा पोस्ट केले आहेत. अभिषेकच्या ट्वीटपेक्षा सध्या अमिताभ यांचं हे ट्वीटच सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अमिताभ मागच्या बऱ्याच काळापासून त्यांच्या ट्वीटमध्ये उल्लेख करत असलेल्या WHTCTW चा अर्थ नक्की काय आहे हे कोणालाच समजत नाही आहे आणि त्यामुळे चाहते गोंधळले आहेत. त्यामुळे अनेक युझर्सनी आता अमिताभ बच्चन यांनाच हे WHTCTW नक्की काय आहे ते सांगण्याची विनंती केली आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांचा 'चेहरे' हा चित्रपट ९ एप्रिलला चित्रपटगृहात रिलीज होणार होता. पण करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पण जर अमिताभ यांचा चित्रपट जर ठरलेल्या दिवशी रिलीज झाला असता. तर मात्र अमिताभ आणि अभिषेक यांच्यात बॉक्स ऑफिस टक्कर नक्कीच झाली असती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ms283i