नवी दिल्लीः पॉप्यूलर टेक कंपनी Dell ने बुधवारी , G15 Ryzen Edition आणि Alienware M15 Ryzen Edition R5 नावाचे ३ जबरदस्त गेमिंग लॅपटॉप लाँच केले आहेत. या गेमिंग लॅपटॉपची सुरुवातीची किंमत जवळपास ६७ हजार रुपये आहे. डेलच्या तिन्ही लेटेस्ट गेमिंग लॅपटॉपला RTX 30-series GPU सोबत लाँच केले आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे गेमर्ससाठी किती खास आहे. वाचाः डेलच्या या तिन्ही लॅपटॉपला वेगवेगळ्या प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. या ठिकाणी Dell G15 ला 10th-Generation Intel Core i7 प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. तर को AMD Ryzen 7 5800H प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. Dell Alienware M15 Ryzen Edition R5 ला AMD Ryzen 9 5900HX प्रोसेसर सोबत लाँच केले आहे. वाचाः कलर आणि किंमत Dell G15 ला Dark Shadow Grey, Specter Green आणि Phantom Grey कलर ऑप्शन सोबत लाँच केले आहे. याची किंमत ८९९ डॉलर म्हणजेच ६७ हजार रुपये आहे. तर Dell G15 Ryzen Edition को Phantom Grey आणि Specter Green कलर ऑप्शन मध्ये लाँच केले आहे. याची किंमत ६७ हजार रुपये आहे. डेल ने Alienware M15 Ryzen Edition R5 ला १७९३ डॉलर म्हणजेच जवळपास १.३ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहे. वाचाः डेलच्या या गेमिंगचे खास वैशिष्ट्ये डेल कंपनी ने Dell G15 आणि Dell G15 Ryzen Edition गेमिंग लॅपटॉपला 15.6 इंचाच्या डिस्प्ले सोबत लाँच केले आहे. याचे रिझॉल्यूशन 1920x1080 पिक्सल आहे. या लॅपटॉपचे डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz पासून 165Hz पर्यंत आहे. या दोन्ही लॅपटॉपमध्ये ३२ जीबी रॅम दिला आहे. यात २ टीबीपर्यंत स्टोरेजचा ऑप्शन दिला आहे. या लॅपटॉपला वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये Nvidia GeForce GTX 1650, Nvidia GeForce RTX 3060 सारख्या ग्राफिक्स कार्ड दिले आहेत. बाकी फीचर्स मध्ये इंटिग्रेटेड वेबकॅम, डुअल ऐरे डिजिटल मायक्रोफोन, फास्ट चार्जिंग सारखे अनेक फीचर्स दिले आहेत. वाचाः Dell Alienware M15 Ryzen Edition R5 गेमिंग लॅपटॉप मध्ये 15.6 इंचाचा QHD डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन रिजॉल्यूशन 2560x1440 पिक्सल आणि डिस्प्ले रिफ्रेश रेट 240Hz आहे. या लॅपटॉपमध्ये 32GB रॅम आणि 4TB पर्यंत स्टोरेज ऑप्शन दिला आहे. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार Nvidia GeForce RTX 3060 आणि Nvidia GeForce RTX 3070 ग्राफिक्स कार्ड लावू शकतात. बाकीच्या फीचर्स मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टची बॅटरी Alienware HD 720p वेबकॅम, Dual-Array मायक्रोफोन सह अनेक फीचर्स दिले आहेत. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3s0RNfS