नवी दिल्लीः करोना व्हायरसने Coronavirus पुन्हा एकदा जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतात तर गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या करोनावर मात करण्यात अपयश येत असताना आता आणखी एक धक्का देणारी बाब समोर आली आहे. एका शोधकर्त्यांच्या टीमने हा दावा केला आहे की, चीनच्या वुहान मध्ये सध्याच्या करोनापेक्षाही धोकादायक करोना व्हायरस सापडला आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, चीनच्या अन्य शहरातील कृषि प्रयोगशाळेतील तांदूळ आणि कापूस यांच्या जेनेटिक डेटाच्या आधारावर ही बाब समोर आली आहे. वाचाः करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने अनेक जण त्रस्त असताना आता वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. चीन पुन्हा एकदा जगाला अडचणीत आणू शकतो. हा व्हायरस जास्त धोकादायक असू शकतो. कारण, कृषि प्रयोगशाळेत मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये किंवा वायरोलॉजी लॅप प्रमाणे मजबूत सुरक्षा व्यवस्था नाही. वाचाः चीनमध्ये अनेक धोकादायक व्हायरस या शोधाला ArXiv नावाच्या प्रीप्रिंट सर्वर मध्ये प्रकाशीत करण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले की, चीनच्या वुहान आणि अन्य शहरातील कृषि प्रयोगशाळेत (Agricultural Labs) मध्ये व्यक्तींना नुकसान पोहोचवणारे अनेक धोकादायक व्हायरस उपलब्ध आहेत. जर याला सुरक्षित पणे कंट्रोल केले गेले नाही तर संपूर्ण जगाला अडचणीत आणले जाऊ शकते. वाचाः चीनी सरकारकडून खंडन सर्व जेनेटिक डेटा वुहान इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (Wuhan Institute of Virology) मध्ये काढले होते. यावरून आता जगभरात संशयाचे वातावरण आहे. या लॅपमधून करोना व्हायरस कोविड १९ महामारी चुकून पसरली आहे. चीन सरकारने हे वारंवार नाकारले आहे. परंतु, जगभरातील शास्त्रज्ञांना या लॅबवर संशय आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d5uwoO