मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा सगळ्यात शांत खेळाडू कोण असं जर कोणाला विचारलं तर आजही अनेकजण हेच नाव घेतील. क्रिकेटप्रेमींमध्ये तो शांत स्वभावासाठी लोकप्रिय आहेत. क्रिकेटच्या मैदानावर तो कधीही रागावलेला दिसला नाही. फक्त क्रिकेटचं नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही राहुलला खूप कमी वेळा रागावताना पाहिलं गेलंय. दरम्यान, राहुलचा आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करताना आणि तोडफोड करताना दिसतो. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही या व्हिडिओची दखल घेत यासंबंधी ट्वीट केलं आहे. आतापर्यंत राहुल भाईचं हे रुप कधीच पाहिलं नसल्याचं तो यावेळी म्हणाला. विराटने राहुलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात राहुल प्रचंड रागावलेले दिसत आहे. गाडीत बसून तो तिथे उपस्थित अनेकांवर चिडताना आणि रागावताना दिसत आहे. इतकंच नाही तर तो त्याचा राग शेजारी उभ्या असलेल्या गाड्यांवरही काढत आहे. गाडीचा आरसा बॅटने तोडताना राहूल या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचं हे रूप चाहत्यांसाठी अगदी नवीनच आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ने लिहिलं, 'राहुल दादाची ही बाजू कधीही पहिली नाही.' खरं तर या व्हिडिओमध्ये राहुल खरंच रागावलेला नसून एका जाहिरातीसाठी अभिनय करत आहे. परंतु, त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का नक्कीच बसला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. सध्या राहुल द्रवीड एनसीएमध्ये डायरेक्टर म्हणून काम करत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये राहुल याने १६४ सामन्यांमध्ये ५२. ३१ च्या रन रेटने १३ हजार २८८ धावा केल्या होत्या. ज्यात ३६ शतक आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सगळ्यात जास्त धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये राहुल दुसऱ्या स्थानावर आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PTZXd9