Full Width(True/False)

अशी होते महेश बाबूच्या दिवसाची सुरुवात; नम्रतानं शेअर केला खास फोटो

अभिनेता दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरहिरो असला तरी त्याचे चाहते जगभरात आहेत. हे सर्व स्टारडम मिळवण्यासाठी महेश बाबूनं तितकीच मेहनत केली आहे. बाल कलाकार म्हणून त्यानं काम सुरू केलं होतं. महेश बाबू आणि त्याची पत्नी यांची जोडीही नेहमीच चर्चेत असते. नम्रतानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत महेश बाबू सकाळी उठल्यानंतर काय करतो, हे सांगितलं आहे. या फोटोत महेश बाबू त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्यांसोबत खेळताना दिसत आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे. मागच्या वर्षी करोनाच्या संक्रमणात महेश बाबूनं आपला संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला होता. पण जसं करोनाचं संक्रमण कमी झालं तसं त्यानं करोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात केली होती. करोनाच्या काळात महेश बाबून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्यानं लिहिलं, 'आपल्या सर्वांसाठी हा काळ कठीण आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला आपण पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. बाकी सर्व गोष्टी तुमची वाट पाहू शकतात.' महेश बाबूच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लवकरच तो 'सरकारु वारी पाटा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचं शूटिंग नुकतंच संपलं आहे. याशिवाय तो अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत 'पॅन इंडिया' या चित्रपटातही दिसणार आहे. जान्हवी या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पादर्पण करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fXIKbJ