Full Width(True/False)

चाललंय काय! अजय देवगणने विकत घेतला ६० कोटींचा बंगला

मुंबई- गेल्या दोन वर्षात देशातील करोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पण अशात बॉलिवूडमधील काही स्टार आहेत ज्यांना या लॉकडाउनचा काही फरक पडलेला नाही. अलीकडेच यांनी ३१ कोटींचं घर विकत घेतलं. त्याआधी अर्जुन कपूरनेही २० कोटी रुपयांमध्ये एक अपार्टमेंट विकत घेतलं होतं. अर्जुनचं घर मलायकाच्याच बिल्डींगमध्ये आहे. आता या यादीत अजय देवगनचं नावही सहभागी झालं आहे. असं म्हटलं जात आहे की, अजय देवगणने जुहू भागात नवीन बंगला विकत घेतला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ६० कोटी रुपये आहे. ५ हजार ३१० चौरस फुटांचा आहे बंगला अजय देवगणचा हा मुंबईतील दुसरा बंगला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, आणि यांचा हा बंगला ५९० चौरस यार्ड म्हणजेच ५ हजार ३१० चौरस फुटांमध्ये पसरलेला आहे. हा बंगला अजयच्या जुन्या घराच्या जवळ आहे. अजय सध्या जुहू येथील कपोले को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटीच्या 'शक्ती' बंगल्यात राहत आहे. हृतिक, अमिताभ, धर्मेंद्र आणि अक्षय झाले सख्खे शेजारी अजय देवगणच्या प्रवक्त्याने नवीन बंगला विकत घेण्याच्या बातमीची पुष्टी केली आहे. अजय सध्या ज्या गल्लीत राहत आहे त्याच गल्लीत हा नवीन बंगला आहे. असं असलं तरी प्रवक्त्याने बंगल्याच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण रिअल इस्टेटशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार याची किंमत ६० कोटी रुपये आहे. अजयचा हा नवीन बंगला हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि अक्षय कुमार यांच्या घरांच्या जवळ आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केला करार, ७ मे रोजी केली नोंदणी अहवालानुसार, अजय देवगन आणि काजोल गेल्या एक वर्षापासून नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत होते. या नवीन बंगल्यासाठीचा करार गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अंतिम करण्यात आला. पैसे भरल्यानंतर हा बंगला वीणा वीरेंद्र देवगन आणि विशाल उर्फ अजय देवगन यांच्या नावाने ७ मे रोजी नोंदणी करण्याता आला. महामारीचा अजय देवगणला झाला फायदा रिअल इस्टेटशी संबंधित तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बंगल्याची किंमत किमान ६५ ते ७० कोटी रुपये इतकी आहे. परंतु महामारीमुळे घरांच्या किंमती खाली आल्या. त्यामुळे अजय देवगणने ६० कोटींमध्ये आलीशान बंगला विकत घेतला. यासह महामारीमुळे स्थावर मालमत्तेतील मुद्रांक शुल्कातही सूट देण्यात आली होती. याचा अजयलाही फायदा झाला. असे म्हटले जाते की देवगण कुटुंबाने बंगल्याचा ताबा घेतला असून सध्या त्यामध्ये नूतनीकरणाचे कामही सुरू झाले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3c11ZA3