Full Width(True/False)

इथं सारं काही आहे फेक; रिअॅलिटी शोमध्ये दाखवल्या जातात खोट्या प्रेमकहाण्या

मुंबई : विविध वाहिन्यांवरून मालिका जितक्या आवडीने पाहिल्या जातात तिकक्याच आवडीने रिअॅलिटी कार्यक्रमही पाहिले जातात. अनेकदा मालिकांपेक्षा रिअॅलिटी कार्यक्रम अधिक लोकप्रिय व्हावेत यासाठी त्या कार्यक्रमांचे निर्माते,वाहिन्या काही गोष्टी जाणीवपूर्वक करतात. मग यामध्ये कार्यक्रमाचा सूत्रधार आणि त्या कार्यक्रमाचा परीक्षक यांच्यात प्रेमकहाणी असल्याचे भासवले जाते, तर कधी काही गंभीर गोष्टी दाखवल्या जातात. केवळ यावरच या गोष्टी थांबत नाही तर या कार्यक्रमातील स्पर्धकांमध्ये दाखवली गेलेली प्रेमकहाणी देखील खोटी असल्याचे काही दिवसांनी समोर येते. अशाच काही रिअॅलिटी शोमध्ये दाखवलेल्या गेलेल्या प्रेमकहाण्यांबद्दल जाणून घेऊ यात.... पनवदीप राजन आणि अरुणिता कंजीलाल १२ मध्ये सहभागी झालेले पवनदीप आणि अरुणिता या स्पर्धकांमध्ये प्रेमकहाणी फुलली असल्याचे सध्या दाखवले जात आहे. अर्थात या दोघांमध्ये सुरू असलेले प्रेमप्रकरण खोटे असल्याचा दावा प्रेक्षकांनी केला होता. आता प्रेक्षकांचा हा दावा खरा असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने देखील या पवनदीप आणि अरुणिता यांच्यातील प्रेमप्रकरण खोटे असल्याचे मान्य केले आहे. करण पटेल आणि अमिता चांदेकर छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला अभिनेता म्हणून करण पटेल ओळखला जातो. त्याच्या चाहत्यांमध्ये महिला प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे सातत्याने त्याची प्रेमप्रकरणे चर्चेत असायची. नच बलिये ३ कार्यक्रमात करण अमिता चांदेकर बरोबर सहभागी झाला होता. या कार्यक्रमावेळी या दोघांची लव्हस्टोरी सर्वांच्याच चर्चेचा विषय झाली होती. दरम्यान, या कार्यक्रमातून बाहेर गेल्यानंतर हे दोघेजण वेगवेगळे झाल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर करणने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, अमिता त्याची कधीच गर्लफ्रेंड नव्हती. परवेझ राणा आणि क्लॉडिया सिएस्ला बिग बॉसच्या घरातमध्ये परवेझ राणा आणि क्लॉडिया सिएस्ला यांची भेट झाली. या कार्यक्रमावेळी या दोघांची छान केमेस्ट्री जुळलेली सर्वांनी पाहिली होती. इतकेच नाही तर बिग बॉसच्या घरात असतानाही हे दोघे एकमेकांशी दोन दोन तास बोलत बसायचे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर कायम क्लॉडिबरोबरच रहाणार असल्याचे परवेझने अनेकदा सांगितले होते. परंतु या कार्यक्रम संपल्यानंतर हे दोघे दोन दिशांना निघून गेले. सारा खान आणि अली मर्चेंट बिग बॉसच्या घरामध्ये सारा खान आणि अली मर्चेंट यांनी तर चक्क लग्न केले होते! त्यावर या दोघांनी सांगितले होते की, आम्ही दोघेजण अनेक दिवस एकमेकांसोबत आहोत आणि एकमेकांशी लग्न करण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे बिग बॉसने या दोघांच्या घरच्यांना बोलावून त्यांचा निकाह लावून दिला होता. या दोघांचे प्रेमप्रकरण आणि त्यानंतर लग्न यामुळे या कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला त्यातबरोबर या कार्यक्रमाला चांगला टीआरपीही मिळाला होता. परंतु या कार्यक्रमातून बाहेर आल्यानंतर या दोघांचेही लग्न तुटले... नेहा कक्कर आणि आदित्य नारायण टिव्हीवरून प्रसारित होणा-या रिअॅलिटी कार्यक्रमातील सर्वात मोठे ढोंग प्रेक्षकांनी इंडियन आयडल ११ कार्यक्रमात पाहिले आहे. या कार्यक्रमात नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्यात प्रेमप्रकरण असल्याचे दाखवले होते. इतकेच नाही तर या दोघांनी लवकरच लग्न करणार असल्याची ही घोषणा केली होती. त्यामुळे प्रेक्षकांनाही या दोघांच्या लग्नाची कमालीची उत्सुकता होती. त्यांची ही उत्सुकता अधिक ताणली जावी यासाठी चॅनेलवाल्यांनी या दोघांच्या पालकांना इंडियन आयडलच्या सेटवर बोलावले आणि त्यांची भेट घडवून आणली होती. आता या दोघांचे लग्न कधी होते याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच या दोघांचे लग्न ही मस्करी असल्याचे समोर आले. त्यानंतर नेहाचे खरेखुरे लग्न करत असल्याचे जाहीर केले. तेव्हा देखील प्रेक्षकांचा त्यावर लगेचच विश्वास बसला नाही. असे सांगून ती तिच्या कोणत्या नवीन प्रोजेक्टचे प्रमोशन तर करत नाही ना, अशी शंका त्यांना वाटत होती. राखी सावंत आणि इलेश जिथे ड्रामेबाजीचा विषय सुरू आहे तिथे राखी सावंतचे नाव यायलाच हवे. राखी सावंतने स्वयंवर करणार असल्याची घोषणा एका वाहिनीवरून केली होती. या वाहिनीने तिचे स्वयंवर आयोजित केले होते. या स्वयंवरामध्ये राखीचे अनेक चाहते सहभागी झाले होते. त्यातील एकाची निवड राखीने केली. खरे तर लग्न करायचे असे ठरले असताना राखीने हा मामला साखरपुडा करून मिटवला आणि कार्यक्रम ही संपवला. अर्थातच हा कार्यक्रम संपला आणि त्यानंतर राखी आणि इलेश हे दोघे वेगवेगळे झाले. अश्मित पटेल आणि वीणा मलिक अश्मित आणि वीणा हे दोघेजण बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. या दोघांमधील मैत्री आणि प्रेम याची खूप चर्चा त्यावेळी झाली होती. बिग बॉसच्या घरात ते नेहमीच एकमेकांच्या सोबत असायचे. त्यामुळे हे दोघे बाहेर आल्यानंतर एकमेकांशी लग्न करतील अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. परंतु हा कार्यक्रम संपला आणि ही जोडी एकमेकांच्या आयुष्यातून गायब झाली. मल्लिका शेरावत आणि विजय सिंह राखी सावंतप्रमाणेच मल्लिका शेरावतनेही आपल्या आयुष्यातील राजकुमार शोधण्यासाठी रिअॅलिटी कार्यक्रमाचा आधार घेतला होता. मल्लिकाच्या या कार्यक्रमाचे नाव होते, 'मेरे ख्यालों की मल्लिका.' या कार्यक्रमात मल्लिकाला विजय सिंह आवडला होतो. या दोघांच्या प्रेमाची चर्चा खूप रंगली होती. परंतु कालांतराने हे दोघे वेगळे झाले. हे दोघे का वेगळे झाले यावर प्रेक्षक विचारच करत राहिले...


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wmNhLt