मुंबई: बॉलिवूड अभनेता यांचं मागच्या वर्षी २९ एप्रिलला निधन झालं. त्यांच्या निधनला एक वर्ष पूर्ण होऊन गेलं पण त्यांच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इरफान खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता. इरफान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा बाबिल नेहमीच सोशल मीडियावर आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर करताना दिसतो. बाबिलच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. बाबिल खाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर दिवंगत वडील इरफान खानचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात इरफान खान हातात बूट घेऊन बसलेला दिसत आहे. या फोटोला बाबिलनं फारच भावुक कॅप्शन दिलं आहे. त्यानं आपल्या वडिलांना उद्देशून लिहिलं, 'मी हरवलो आहे. कोणावर विश्वास ठेवावा हेच समजत नाही आहे. मला आता स्वतःवरच संशय यायला लागला आहे. तुम्हाला माहीत आहे का? मला असुरक्षित वाटतं, मला या जगाची भीती वाटत आहे. माझं मन स्वतःशीच युद्ध करत आहे. मनात एक प्रकारची निराशा आहे आणि त्यामुळे मी खचलो आहे.' बाबिलच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी कमेंट करत बाबिलला धीर दिला आहे. बाबिलच्या या पोस्टवर अनूप सोनी, संध्या मृदुल, टिस्का चोप्रा यांनी कमेंट केल्या आहेत. बाबिलच्या पोस्टवर कमेंट करताना संध्यानं लिहिलं, 'हा कठीण काळ आहे. पण निराशजनक अजिबात नाही. मला माहीत आहे कधीतरी तुला हे समजेल. लव्ह यू.' तर अनूप सोनी यांनी बाबिलच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिलं, 'खंबीर हो. खूप सारं प्रेम.' नेहमीच वडिलांच्या आठवणी सोशल मीडियावरून शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच त्यानं आई सुतापा सिकदर यांच्यासाठीही एक पोस्ट शेअर केली होती. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. बाबिलच्या कामाबद्दल बोलायचं तर तो बॉलिवूड पदार्पणासाठी तयार असून 'काला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्माती अनुष्का शर्मा आहे. काही दिवसांपूर्वीच बाबिलनं या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QIvPBW