नवी दिल्लीः नूबियाने आपला स्मार्टफोन ला चीनमध्ये लाँच केले आहे. Nubia Z30 Pro मध्ये स्लिम बेजल सोबत पंचहोल डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, या फोनमध्ये बॅक पॅनेलवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. Nubia Z30 Pro च्या बॅक पॅनेलवर नूबियाचा ३डी लोगो दिला आहे. याशिवाय, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर दिला आहे. फोनला तीन रॅम आणि स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. वाचाः Nubia Z30 Pro ची किंमत Nubia Z30 Pro ची सुरुवातीची किंमत ४९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास ५६ हजार ८०० रुपये आहे. या किंमतीत ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ स्टोरेजच्या फोनची किंमत ५३९९ चिनी युआन म्हणजेच ६१ हजार ३०० रुपये आहे. फोनच्या १६ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५९९९ चिनी युआन म्हणजेच ६८ हजार १०० रुपये आहे. फोनची विक्री २५ मे पासून चीनमध्ये होणार आहे. भारतात फोनची लाँचिंग कधीपर्यंत होणार यासंबंधी कंपनीकडून अद्याप काही सांगितले नाही. वाचाः Nubia Z30 Pro चे फीचर्स या फोनमध्ये अँड्रॉयड ११ वर आधारित Nubia UI 9.0 दिले आहे. यात ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १४४ एचझेड आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर, १६ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. वाचाः Nubia Z30 Pro चा कॅमेरा या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात पहिला लेन्स ६४ मेगापिक्सलचा आहे. सोबत ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन दिला आहे. दुसरा लेन्स ६४ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आहे. तिसरा लेन्स सुद्धा ६४ मेगापिक्सलचा आणि चौथा लेन्स ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यात 4200mAh ची बॅटरी दिली आहे. 120W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, फोन फक्त १५ मिनिटात चार्ज होतो. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ublyMa