Full Width(True/False)

VIDEO: जेव्हा अभिषेकच्या समोरच चाहत्यानं ऐश्वर्याला केलं होतं प्रपोज

मुंबई : अतिशय शांत व्यक्तिमत्त्वाचा म्हणू ओळखला जातो. कोणत्याही वादामध्ये अभिषेकचे नाव कधीच नसते. परंतु त्याच्यावर जर कुणी विनाकारण टीका केली तर अशा व्यक्तीला अभिषेक चोख उत्तर देतो. झगमगत्या विश्वात लहानपणापासून अभिषेक वावरला असला तरी त्याची स्वतःची अशी काही ठाम विचारधारा आहे, मते आहेत. त्यामुळेच तो इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळा ठरतो. त्यामुळेच तो कोणत्याही वादांमध्ये अडकलेला नाही. अर्थात असे असले तरी कधीकधी अभिषेक बच्चन चर्चेत येतो. अलिकडेच त्याचा आणि ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात अभिषेकची जी प्रतिक्रिया होती ती नक्कीच पाहण्यालायक अशी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. काय आहे व्हिडीओ? हा व्हिडीओ २०१० मधला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघेही कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. या दोघांनी रेड कार्पेटवर एकत्र एंट्री केली. हे दोघेही आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होते. तेव्हा तिथे असलेल्या एका चाहत्याच्या हातामध्ये एक बॅनर होता. त्यावर लिहिले होते, 'ऐश्वर्या माझ्याशी लग्न कर...' अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे लक्ष या चाहत्यांकडे जाते. ते पाहून ऐश्वर्या त्या चाहत्याकडे पाहून स्मितहास्य करते आणि लांबूनच त्याला हॅलो करते. तर अभिषेक ऐश्वर्याकडे इशारा करत म्हणतो, 'तिने आधीच माझ्याशी लग्न केले आहे...' आणि असे म्हणून अभिषेकही हसतो. अभिषेकने दिलेली ही प्रतिक्रिया चाहत्यांना खूपच आवडली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात असलेले बाँडिंग पाहून त्यांचे चाहते खूष होतात. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी २००७ मध्ये लग्न केले. या दोघांची पहिली भेट १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर या दोघांनी धूम २, उमरावजान आणि गुरू यांसारख्या सिनेमांत एकत्र काम केले आहे. अभिषेकच्या सिनेकरीअरबद्दल सांगायचे तर काही दिवसांपूर्वी त्याचा 'द बिग बुल' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. लवकरच अभिषेक बॉब बिस्वास या सिनेमात दिसणार आहे. तर ऐश्वर्या रायने अनिल कपूर आणि राज कुमार राव सोबत 'फन्ने खान' सिनेमात दिसली होती. लवकरच ती मणिरत्न यांच्या 'पोन्नियन सेल्वन' या सिनेमात दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fyJyU7