मुंबई- बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माते आणि दिग्दर्शक असलेले यांची मुलगी सध्या तिचा बॉयफ्रेण्ड शेन ग्रेगोअरला डेट करत आहे. आलिया सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती शेनसोबतचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओत आलियाने तिच्या आणि शेनच्या पहिल्या भेटीबद्दल अनेक मजेशीर किस्से सांगितले आहेत. त्यातही शेन पुढाकार घेत नसल्यामुळे मलाच त्याला किस करावं लागल्याचं आलियाने सांगितलं. डेटींग अँपवर भेटले होते आलिया आणि शेन आलिया नेहमीच तिच्या वैयक्तिक गोष्टी तिच्या युट्युब चॅनेलवर शेअर करत असते. आपला पहिला किस खूप विचित्र होता असं आलियाने सांगितलं. आलियाच्या म्हणण्यानुसार तिची आणि शेनची भेट एका डेटिंग अँपवर झाली. एका राइट स्वाइपने आम्हाला एकत्र आणलं आणि मग आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या, असं आलियाने म्हटलं. सोशल मीडियावर आलिया आणि शेन हे चाहत्यांचे आवडते कपल आहेत. एका डेटिंग अँपवर भेटल्यावर त्यांनी जवळपास दोन महिने एकमेकांशी चॅटींग केली होती. दोघांनीही एकमेकांना भेटण्यासाठी मुळीच घाई केली नव्हती. असा होता पहिल्या किसचा अनुभव पहिल्या किसबद्दल सांगताना आलियाने म्हटलं, 'दोन महिन्यांच्या चॅटींगनंतर अखेर भेटण्याचा दिवस ठरवला. आम्ही भेटलो तर पहिला कीसदेखील झाला पण तो खूप विचित्र होता. मी वाट पाहत होते की शेन आता मला किस करेल, नंतर किस करेल पण तसं काहीच होत नव्हतं. त्याला वाटत होतं की कदाचित मी गोंधळून जाईन आणि मला ते आवडणार नाही. त्यामुळे मी खूप वेळ वाट पाहिली आणि शेवटी ठरवलं की मीच पहिलं किस करते. तो किस पण किती विचित्र होता. शेन माझ्याशी बोलत होता आणि मी अचानक त्याला किस केलं. मी त्यानंतर बराच वेळ या गोष्टीवर विचार करत होते. मला सगळ्यांना चांगली वागणूक देणारे पुरुष आवडतात. फक्त माझ्यासोबतच नाही तर सगळ्यांसोबत चांगले वागणारे पुरुष आवडतात. शेन तसा आहे त्यामुळे आमचं जुळलं.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2S8n70f