Full Width(True/False)

ज्युनियर एनटीआरवर झाला होता बालविवाहाचा आरोप, बातमी पसरताच...

मुंबई- तारक आणि यांसारख्या नावांनी लोकप्रिय असलेला अभिनेता नंदमुरी तारक रामा राव आज त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. 'स्टूडेंट नं 1', 'राखी', 'सिम्हाद्री', 'टेंपर', 'प्रेमाथो', 'जनता गैराज' आणि 'बादशाह' यांसारखे हिट चित्रपट देणाऱ्या ज्युनियर एनटीआरने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये ज्युनियर एनटीआरचं नाव घेतलं जातं. परंतु, या प्रसिद्ध अभिनेत्यावर कधीकाळी बालविवाहाचे आरोप करण्यात आले होते. बालकलाकार म्हणून केलं चित्रपटात काम ज्युनियर एनटीआरने १९९१ सालच्या 'ब्रह्मार्षि विश्वामित्र' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या 'रामायण' चित्रपटात ज्युनियर एनटीआरला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आलं होतं. ज्युनियर एनटीआरने २००४ सालच्या 'आदी' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. याशिवाय या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करून सगळ्यांनाच आश्चर्य चकित केलं होतं. त्यानंतर २०१३ साली आलेला बादशहा चित्रपटही हिट ठरला. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. लग्नाबद्दल झाले होते अनेक वाद ज्युनियर एनटीआरने तेलगू चॅनलच्या मालकाची मुलगी प्रणती सोबत लग्नगाठ बांधायचं ठरवलं. २०११ साली त्यांनी साखरपुढा देखील केला . परंतु, ज्यावेळेस ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मीचा साखरपुढा झाला तेव्हा लक्ष्मी फक्त १७ वर्षांची होती. त्यामुळे ज्युनियर एनटीआरच्या लग्नाच्या वार्ता कळताच विजयवाडामधील वकील सिंगुलुरी शांति प्रसाद यांनी अभिनेत्याविरोधात बालविवाह कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली. त्यानंतर होणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी ज्युनियर एनटीआरने आणखी काही महिने वाट पाहून ५ मे २०११ मध्ये लक्ष्मीसोबत विवाह केला. त्यावेळेस लक्ष्मीला १८ वर्ष पूर्ण झाली होती. आता ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मी त्यांच्या आयुष्यात सुखी असून त्यांना दोन मुलंही आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vh7nGZ