नवी दिल्लीः मायक्रोसॉफ्ट ने आपले नवीन लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट सरफेस लॅपटॉप ४ (Microsoft Surface Laptop 4) ला भारतात लाँच केले आहे. गेल्या महिन्यात या लॅपटॉपला ग्लोबली लाँच करण्यात आले होते. ला भारतात दोन साइजमध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यात १३.५ इंच आणि १५ इंचाचा समावेश आहे. दोन्ही लॅपटॉपमध्ये टचस्क्रीन आहे. तसेच डॉल्बी अॅटमॉस सराउंडचा सपोर्ट दिला आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेलची ११ वे जनरेशनचे प्रोसेसर दिले आहे. यात १६ जीबी रॅम दिला आहे. वाचाः Microsoft Surface Laptop 4ची किंमत Microsoft Surface Laptop 4 ची किंमत १ लाख २ हजार ९९९ रुपये आहे. ही किंमत १३.५ इंचाच्या व्हेरियंटची आहे. या लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 5 4680U CPU, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी एसएसडी स्टोरेज सोबत येते. तर १५ इंचाच्या मॉडलला AMD Ryzen 7 4980U सोबत खरेदी केल्यास याची किंमत १ लाख १३ हजार ९९९ रुपये आहे. १३ इंचाच्या लॅपटॉपमध्ये इंटेल कोर i5-1135G7, १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी एसएसडी स्टोरेज मॉडलची किंमत १ लाख ५ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Microsoft Surface Laptop 4 चे फीचर्स या लॅपटॉप मध्ये ३.२ पिक्सल लेन्स हाय कॉन्ट्रास्ट डिस्प्ले दिला आहे. सोबत ११ वे जनरेशन इंटेल कोर आणि AMD Ryzen 5 किंवा Ryzen 7 प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यासोबतच १६ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत SSD स्टोरेज दिला आहे. लॅपटॉपमध्ये Omnisonic स्पीकर दिले आहे. सोबत डॉल्बी अॅटमॉसचा सपोर्ट दिला आहे. फ्रंट मध्ये एचडी कॅमेरा दिला आहे. याला खास लो लाइटसाठी डिझाइन करण्यात आले आहे. वाचा : लॅपटॉपमध्ये फेस रिकॉग्निशन दिले आहे. कनेक्टिविटीसाठी लॅपटॉपमध्ये Wi-Fi 6, ब्लूटूथ v5, USB टाईप-सी पोर्ट, USB टाईप-ए आणि 3.5mm चे हेडफोन जॅक आहे. AMD Ryzen वेरियंटची बॅटरी १६ तास आणि इंटेलच्या मॉडलला १७ तासांची बॅटरी बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uk3Vd1