Full Width(True/False)

मी हिरड्या दाखवून हसते आणि मला त्याची लाज वाटत नाही...ट्रोलर्सना तेजस्विनीचं सडेतोड उत्तर

मुंबई- बॉलिवूड असुदे किंवा मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी युझर्सच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. नेटकरी कलाकारांना कोणत्या कारणावरून ट्रोल करतील याचाही काही नेम नसतो. ट्रोलर्सना तर छोटंसं कारणही पुरतं. अगदी शुल्लक गोष्टींवरही कलाकारांना ट्रोल करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. नुकताच मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतला देखील अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. परंतु, तेजस्विनीने एक पोस्ट करत ट्रोलर्सना सणसणीत चपराक लगावली आहे. तेजस्विनीच्या पोस्टवर काही प्रेक्षक जाणूनबुजून वाईट कमेंट करत होते. तिच्या हसण्याची खिल्ली उडवत होते. तेजस्विनी हसल्यावर तिच्या दातांसोबत हिरड्याही दिसतात असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु, समोरच्याला सडेतोड उत्तर देऊन गप्प बसवणारी तेजस्विनीदेखील या ट्रोलर्सना पुरून उरली आहे. तेजस्विनीने एक पोस्ट शेअर करत मी हिरड्या दाखवून हसते याची मला मुळीच लाज वाटत नाही, असं म्हटलं आहे. आपला मनमोकळेपणाने हसतानाचा फोटो शेअर करत तेजस्विनीने लिहिलं, 'माझ्याकडे काय ती म्हणतात ती परफेक्ट स्माइल वगरै नाहीये आणि तसे दातही नाहीयेत. मी हिरड्या दाखवून हसते आणि मला त्याची अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं? त्यातून हसणं ... छे!!!' भविष्याबद्दल चिंता व्यक्त करत तेजस्विनीने पुढे लिहिलं, 'आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. दात दाखवून असो किंवा खळखळून असो... मला हसायला आवडतं. हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात... हल्ली हसायला फार कमी मिळतंय, तेव्हा हसायची किंवा हसवण्याची संधी मिळाली तर सोडू नका. ते एका चित्रपटात म्हटलंय ना, क्या पता कल हो ना हो...!!!' तेजस्विनीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तिचं कौतुक केलं आहे. तेजस्विनीने करोनाकाळात रक्तदान करत चाहत्यांनाही मदत करण्याचं आवाहन केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oxYHZX