नवी दिल्लीः सध्या स्मार्टफोन अनेकांकडे असल्याने आपण फोटो, व्हिडिओ पासून टेक्स्ट पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करीत असतो. वर आपण कधी तरी चुकून काही चुका करतो. त्यामुळे डेटा लीक होण्याची भीती असते. त्यामुळे तुम्हाला जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते. वाचाः Whatsapp चुकूनही काही मेसेज फॉरवर्ड करू नका Whatsapp वर २१ दिवसांत पैसे डबल करण्याची स्कीम सारखे मेसेज चुकूनही एकमेकांना पाठवू नका. असे केल्यास तुमचे अकाउंट रिकामे होऊ शकते. व्हॉट्सअॅप मेसेज एन्क्रिप्टेड असतात. त्यामुळे तुम्हाला माहिती हवे की, आपण काय फॉरवर्ड करत आहोत. जर कोणी तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. Whatsapp वर धमकी देणे, अश्लील मेसेज आजिबात फॉरवर्ड करू नका, असे केल्यास तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. वाचाः फेक अकाउंट बनवू नका Whatsapp वर फेक अकाउंट बनवून लोकांना त्रास देण्याचे काम करू नका. फेक अकाउंटमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. जर कोणी असे केले तर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करून त्या व्यक्तीला जेलची हवा खावी लागू शकते. वाचाः Whatsapp हॅक करण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही सॉफ्टवेयर इंजिनियर असाल तर चुकूनही Whatsapp ला हॅक करण्याचा प्रयत्न करू नका. कारण, Whatsapp प्लॅटफॉर्मला हॅक करण्याचा प्रयत्न करणे गंभीर गुन्हा आहे. कंपनी तुम्हाला लीगल नोटीस पाठवू शकते. कोणत्याही धर्माच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज फॉरवर्ड करू नका. असे केल्यास तुम्ही चांगलेच अडचणीत येऊ शकतात. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f34K5F