Full Width(True/False)

सलमान खानच्याही घरी पोहोचला करोना, दोन्ही बहिणी करोना पॉझिटीव्ह

मुंबई: देशात दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. लोखोंच्या संख्येनं लोक या व्हायरसने संक्रमित होताना दिसत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनाही मागच्या काही काळात करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अशात आता हा करोना अभिनेता सलमान खानच्याही घरी जाऊन पोहोचला आहे. सलमान खानच्या बहिणी आणि दोघीही करोना पॉझिटिव्ह आहे. याची माहिती स्वतः सलमाननं दिली आहे. लवकरच 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करोना व्हायरसमुळे हा चित्रपट भारतात फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सलमाननं नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती. यावेळी बोलताना सलमाननं त्याच्या बहिणी अर्पिता खान आणि अलविरा खान करोना पॉझिटीव्ह आहेत मात्र त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षण दिसत नसल्याचं सांगितलं. सलमान खान म्हणाला, मागच्या वर्षी जेव्हा करोना संक्रमितांची संख्या समोर येत होती त्यावेळी कोणला करोना झाल्याचं ऐकू येत होतं. मागच्या वर्षी माझ्या दोन ड्रायव्हर्सना करोनाची लागण झाली होती. पण आता तर तो घरात घुसला आहे. माझ्या जवळची माणसंही आता करोनाग्रस्त आहेत. करोनाची ही दुसरी लाट खूपच घातक आहे. सलमानची बहीण अर्पिता खाननं २०१४ साली अभिनेता आयुष शर्माशी लग्न केलं होतं. मागच्या बऱ्याच काळापासून आयुष चित्रपटांपासून दूर आहे. तर दुसरी बहीण अलविराचं लग्न अभिनेता आणि निर्मिता अतुल अग्निहोत्रीशी झालेलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vWHD2h