Full Width(True/False)

१५ मिनिटात फुल चार्ज होणार स्मार्टफोन, २० मे रोजी फोनची लाँचिंग, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी नूबिया आपल्या होम मार्केटमध्ये २० मे रोजी आपला फ्लॅगशीप फोन ला लाँच करणार आहे. लाँच आधीच या फोनचे प्रायमरी फीचर्स समोर आले आहेत. कंपनीने सांगितले की, नूबिया झेड ३० प्रो स्मार्टफोन 120W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करतो. याशिवाय, हा हँडसेट TENAA सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर सुद्धा दिसला आहे. वाचाः १५ मिनिटात फुल चार्ज होणार फोनच्या नवीन पोस्टरवरून 120W नियो चार्ज टेक्नोलॉजीची माहिती उघड झाली आहे. पोस्टर मध्ये दावा करण्यात येत आहे की, फोन १५ मिनिटात फुल चार्ज होईल. परंतु, Nubia Z30 Pro मध्ये कोणत्या साइजची बॅटरी असेल यासंबंधी कंपनीने अद्याप माहिती दिली नाही. फास्ट चार्जिंग शिवाय, स्मार्टफोनमध्ये Snapdragon 888 प्रोसेसर आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. वाचाः असे असतील फोनचे फीचर्स TENAA सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर फोनची बाकीच्या फीचर्सची माहिती उघड झाली आहे. लिस्टिंग नुसार, फोनमध्ये 1,985mAh ची ड्यूअल सेल बॅटरी दिली जाणार आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले आणि अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम दिला जाणार आहे. फोटोग्राफीसाठी Nubia Z30 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचे तीन सेन्सर असणार आहेत. फोनचा कॅमेरा जबरदस्त फोटो सोबत 50X जूम सपोर्ट करणार आहे. या फ्लॅगशीप फोनमध्ये Snapdragon 888 प्रोसेसर, LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज दिला जाणार आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेरा साठी पंच होल डिझाइन दिली जाऊ शकते. वाचाः वाचा : वाचा : वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3osnrCM