नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ () आपल्या यूजर्सला कमी किंमतीत एकापेक्षा एक शानदार प्लान्स ऑफर करते. कंपनीकडे स्वस्त प्रीपेड प्लान्ससोबतच काही चांगले पोस्टपेड प्लान्स देखील उपलब्ध आहेत. कंपनीकडे यूजर्ससाठी पोर्टफोलियोमध्ये एक खूपच स्वस्त उपलब्ध आहे. ३९९ रुपयांच्या या प्लानमध्ये यूजर्सला शानदार बेनिफिट्स मिळतील. या प्लानमध्ये डेटा,कॉलिंगसोबतच अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळत आहे. या प्लानमध्ये अॅमेझॉन (), डिज्नी+ (Disney+ Hotstar) आणि नेटफ्लिक्सचे () मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. त्यामुळे मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन हवे असणाऱ्या यूजर्ससाठी हा प्लान फायद्याचा ठरू शकतो. Reliance Jio चा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान Reliance Jio च्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये यूजर्सला एकूण ७५ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरची देखील सुविधा मिळते. डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर प्रत्येक १ जीबी डेटासाठी तुम्हाला १० रुपये शुल्क द्यावे लागेल. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएची सुविधा मिळते. यासोबतच, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतील. यात अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon prime Video), डिज्नी+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) आणि नेटफ्लिक्सचे (Netflix) मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. Reliance Jio चा ५९९ रुपये आणि ७९९ चा पोस्टपेड प्लान Reliance Jio कडे ५९९ रुपयांचा आणखी एक शानदार पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये एकूण १०० जीबी डेटा मिळेल. तसेच, एका अतिरिक्त सिम कार्डसोबतच २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जात आहे. तसेच, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएससह अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon prime Video), डिज्नी+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) आणि नेटफ्लिक्सचा (Netflix) मोफत अॅक्सेस मिळतो. जिओच्या ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये देखील मोफत ओटीटी बेनिफिट्स दिले जात आहे. याशिवाय, एकूण १५० जीबी डेटा, २ अतिरिक्त सिम कार्डसह २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते. तसेच, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग देखील करता येईल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XlODcJQ