मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ' १२' कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. कधी कार्यक्रमात एखाद्या स्पर्धकाची गरिबी दाखवली जाते तर कधी दोन स्पर्धकांमधील प्रेम दाखवलं जातं. कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून निरनिराळ्या पद्धती अवलंबल्या जात असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. या मुद्द्यांवरून अनेकदा 'इंडियन आयडल १२' वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. आता 'इंडियन आयडल' च्या पहिल्या सीजनचा विजेता याने स्वतः कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आताच्या 'इंडियन आयडल' मधील आणि तेव्हाच्या 'इंडियन आयडल' मधील फरक अधोरेखित करत अभिजीत म्हणाला, 'आजकाल रिऍलिटी शोमध्ये स्पर्धकाच्या गाण्याऐवजी आणि गुणांऐवजी या गोष्टीवर जास्त भर दिला जातो की त्याला बूट पॉलिश करता येतात की नाही किंवा मग तो किती गरीब आहे. जर तुम्ही स्थानिक गाण्यांचे कार्यक्रम पाहिलेत तर तुम्हाला कळेल की प्रेक्षकांना क्वचितच स्पर्धकांच्या कुटुंबाबद्दल काही माहीत असतं. परंतु, इथे स्पर्धकांची आर्थिक परिस्थिती कार्यक्रमाच्या टीआरपीसाठी वापरली जाते किंवा मग स्पर्धकांमध्ये प्रेमाचा ट्विस्ट दाखवला जातो.' 'इंडियन आयडल ११' मध्ये स्पर्धक सनी हिंदुस्थानीच्या गरीब परिस्थितीचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच 'इंडियन आयडल १२' मध्येही पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्यामधील प्रेमसंबंध दाखवण्यात येत आहेत. यासोबतच किशोरकुमार यांच्या मुलाने स्वतः खुलासा केला होता की त्यांना या कार्यक्रमात पैसे देऊन स्पर्धकांचं कौतुक करायला सांगण्यात आलं. इतरांप्रमाणे अभिजीतही सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. करोनामुळे बंद झालेल्या स्टेज शोचा मोठा फटका अभिजीतला बसला आहे. त्यामुळे त्याचं पैसे कमावण्याचं साधन बंद झालं असल्याचं त्याने सांगितलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wc9kEy