नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे देशात अजूनही वर्क फ्रॉम होमची डिमांड सुरूच आहे. त्यामुळे अनेकांना मोबाइल कॉलिंग आणि डेटाची डिमांड आधीच्या तुलनेत जास्त आहे. वाचाः बीएसएनएलचा नवीन प्लान भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने ग्राहकांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लान आणले आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळतात. तुम्ही जर बीएसएनएलचे ग्राहक असाल तर या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. वाचाः ९४ रुपयांत ९४ दिवसांची वैधता BSNL च्या या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानची किंमत ९४ रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ९० दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये ग्राहकांना ३ जीबी डेटा मिळतो. याचा वापर ग्राहक ९० दिवसांपर्यंत कधीही करू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे, हे प्लान डेटा सोबत ग्राहकांना कॉलिंग बेनिफिट देते. तुम्हाला या प्लानमध्ये तीन महिने रिचार्जची कोणतीही चिंता नाही. वाचाः जुन्या ग्राहकांसाठी उपलब्ध या प्लानमध्ये ६० दिवसांपर्यंत PRBT डिफॉल्ट ट्यून सुद्धा फ्री मिळते. हा प्लान सध्याच्या युजर्संसाठी आहे. नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकासाठी हा प्लान नाही. या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंगचा फायदा दिला जातो. म्हणजेच याचा सरळ अर्थ म्हणजे ग्राहकांना ९० दिवस कोणत्याही नेटवर्कवर १०० मिनिट पर्यंत फ्री व्हॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. त्यानंतर कॉलिंगचे सामान्य शुल्क वसूल केले जाते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o3geJj