Full Width(True/False)

गुड! आता विना पासवर्डचा Gmail करता येणार Login, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : आपल्या सिक्युरिटीला अधिक मजबूत करण्यासाठी नवीन फीचर लाँच करणार आहे. हे फीचर आल्यानंतर यूजर्सला टाकण्याची गरज लागणार नाही. तसेच, दुसरी व्यक्ती तुमचा पासवर्ड आणि यूजर नेम वापरून अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास, ते उघडणार नाही. यामुळे येणाऱ्या काळात तुमचे अकाउंट अधिक सुरक्षित होणार आहे. वाचा : फीचर गुगल टू फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या मदतीने अकाउंटला अधिक सुरक्षित बनवणार आहे. हे फीचर यूजर्सला डिफॉल्ट मिळणार असून, यूजर्सच्या अकाउंटमध्ये हे फीचर ऑटोमॅटिक लागू होईल. गुगलने यासंदर्भात माहिती देताना आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, यूजर्सला गुगल साइन इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करावा लागेल. या फीचरच्या मदतीने यूजर्सला अधिक सेफ्टी मिळेल. जे अकाउंट व्यवस्थितपणे कॉनफिगर केलेले असतील, त्यामध्ये हे फीचर डिफॉल्ट मिळेल. विना पासवर्ड उघडेल जीमेल हे फीचर आल्यानंतर कोणीही तुमचे गुगल अकाउंट तुमच्या डिव्हाइसशिवाय उघडू शकणार नाही. एखाद्या व्यक्तीकडे तुमच्या अकाउंटचे यूजरनेम आणि पासवर्ड असेल, तरीही त्याला अकाउंट उघडता येणार नाही. टू फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या मदतीने अकाउंट लॉगइन केल्यानंतर फोनमध्ये एसएमएस, वॉइस कॉल किंव गुगल अ‍ॅपवर कोड मिळेल. थोडक्यात, पासवर्ड चोरीला गेला तरीही काहीही होणार नाही. वाचाः पासवर्डचा वापर करावा लागणार नाही येणाऱ्या काळात गुगल पासवर्डचा वापर पूर्णपणे समाप्त होणार आहे. याचे कारण यूजर्स एक पासवर्ड सर्व अकाउंटवर वापर असतात. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अथवा टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी फिजिकल सिक्युरिटीचा देखील वापर केला जाऊ शकतो. फिजिकल सिक्यूरिटी की ला लॅपटॉप अथवा यूएसबी पोर्ट, फोनच्या बाजूला ठेवून वापरले जाते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h5Zobo