नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिमीटरची मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. अनेक शहरात ऑक्सिमीटरला वाढत्या किंमतीत विकले जात आहे. परंतु, ऑक्सिजन लेवल मॉनिटर करण्याची एक सोपी पद्धत तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. सध्या बाजारात अशा अनेक आहेत. ज्यात SpO2 फीटर उपलब्ध आहेत. याची किंमत सुद्धा फारसी नाही. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन खरेदी करून घरी बसल्या बसल्या तुमची ऑक्सिजन लेवल तपासू शकता. आज आम्ही तुम्हाला या स्मार्टवॉचसंबंधी खास माहिती देत आहोत. याची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच हे दोन अडीच हजारांच्या पेक्षा चांगला रिझल्ट देतात. वाचाः Noise ColorFit Pro 3 या स्मार्टवॉचची किंमत ४४९९ रुपये आहे. या स्मार्टवॉच मध्ये २४ तास हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर आणि स्ट्रेस मॉनिटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ही स्मार्टवॉच १६ रंगात उपलब्ध करण्यात आली आहे. या स्मार्टवॉच मध्ये १.५५ इंचाचा एचडी टच स्क्रीन TruView TM मॉनिटर दिले आहे. यात ऑटो वॉकिंग आणि रनिंग डिटेक्शन उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचला तुम्ही ई-कॉमर्स प्लेटफॉर्म जसे Amazon आणि Flipkart वरून खरेदी करू शकता. वाचाः Amazfit Bip U SmartWatch या स्मार्टवॉचची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. यात सुद्धा SpO2 सेंसर दिले आहे. सोबत यात हार्ट रेट आणि स्लीप क्वालिटी सारखे फीचर्स दिले आहेत. या स्मार्टवॉच मध्ये 320×302 पिक्सल स्क्रीन रिझॉल्यूशन सोबत १.४३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिले आहे. खाली पडल्यास तुटू फुटू नये यासाठी 2.5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा वापर करण्यात आला आहे. ई-कॉमर्स प्लेटफॉर्म जसे Amazon आणि Flipkart वरून खरेदी करू शकता. वाचाः Realme Watch S या स्मार्टवॉचची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. यात १.३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो 2.5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 सोबत येतो. या स्मार्टवॉच मध्ये ब्लड ऑक्सिजन लेवल चेक करण्यासाठी SpO2 सेंसर दिले आहे. सोबत यात 16 स्पोर्ट्स मोड्स आणि 390mAh ची बॅटरी दिली आहे. ही स्मार्टवॉच Flipkart वर उपलब्ध आहे. वाचाः Fire-Boltt SmartWatch या स्मार्टवॉचची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. यात हेल्थ को मॉनिटर करण्यासाठी चांगले फीचर्स दिले आहेत. ज्यात SpO2 सेंसर, हार्ट रेट सेंसर, बीपी, फिटनेस आणि स्पोर्ट्स ट्रेकिंग आदी फीचर्स दिले आहेत. यात १.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तसेच ७ वर्कआउट मोड्स सुद्धा दिले आहेत. याची बॅटरी सिंगल चार्जमध्ये ८ दिवसपर्यंत चालते. याची विक्री Amazon आणि Flipkart वर सुरू आहे. वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vKjVWW