Full Width(True/False)

Jio सोबत मिळून Vivo आपल्या 'या' स्मार्टफोनवर देतेय 'बंपर ऑफर', जाणून घ्या

नवी दिल्ली. Vivo ने प्रसिद्ध स्मार्टफोन विवो वाय १ एससाठी खास 'जिओ एक्सक्लुझिव्ह' ऑफर जाहीर केली आहे. विवो आणि जिओने या ऑफरसाठी हातमिळवणी केली आहे. व्हिवो वाय १ एस कंपनीने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात बाजारात दाखल केला होता. त्यावेळी (२ जीबी + ३२ जीबी) व्हेरिएंटची किंमत ७,९९० रुपये होती. या वेळी विवो या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट देत असून फोन जिओ सिम कार्डसह देण्यात येत आहे.जाणून घ्या या ऑफर्सविषयी डिटेलमध्ये. वाचा : काय आहे ऑफर वीवोच्या या ऑफरअंतर्गत हा नवीन स्मार्टफोन केवळ ७,१९१ रुपयांना मिळेल. ज्यामधून ग्राहक थेट ७९९ रुपयांची बचत करू शकतात. याशिवाय या ऑफरमध्ये ४,५५० रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला जात आहे. ही ऑफर जिओच्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांना उपलब्ध आहे. तुम्ही आधीपासूनच Jio नेटवर्क वापरत असल्यास या ऑफरचा फायदा घेऊ शकता. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचे Jio सिम कार्ड किमान ३० महिन्यांसाठी प्राथमिक सिम म्हणून वापरावे लागेल. स्मार्टफोन स्मार्टफोनला जियो व्हाउचर म्हणून ४,५५० रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला जात आहे. त्याचा वापर जियो रिचार्जसाठी सूट म्हणून केला जाऊ शकतो. मेक इन इंडिया योजनेंतर्गत व्हिव्होने ग्रेटर नोएडा येथील आपल्या प्लांटमध्ये या स्मार्टफोनची निर्मिती करण्यास सुरवात केली आहे. हा फोन दोन रंगांमध्ये येतो. ज्यामध्ये, ब्लू आणि ब्लॅकचा समावेश आहे. Amazon आणि फ्लिपकार्ट सारख्या खरेदी साइटवरून फोन खरेदी करता येईल. कसा आहे Vivo Y1s स्मार्टफोन या फोनमध्ये कंपनीने ६.२२ इंचचा फुल एचडी + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने २ जीबी रॅम आणि ३२ जीबी अंतर्गत स्टोरेज असलेल्या या फोनचे स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. कॅमेर्‍याबद्दल सांगायचे झाल्यास कॅमेराच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि समोर ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. याची बॅटरी ४,०३० mAh क्षमतेची आहे. हा फोन अँड्रॉइड १० ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) वर काम करतो. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34fQ2lO