नवी दिल्लीः नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आहे. ओप्पो कंपनीने आपल्या कस्टमर्ससाठी ई-स्टोर प्लॅटफॉर्मवर ही डील देण्यात येत आहे. यावर जबरदस्त ऑफर आणि डिल्स मिळणार आहे. वाचाः या तारखेपर्यंत मिळणार फायदा ऑफर्स केवळ लिमिटेड पीरियडसाठी आहे. ओप्पोने म्हटले की, ई-स्टोरवर ११ मे ते १७ मे पर्यंत शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना स्पेशल डिस्काउंट दिला जाणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक बजेट, प्रीमियम स्मार्टफोन, IoT प्रॉडक्ट्स आणि वियरेबल्ससह ८० हून जास्त प्रोडक्ट्स खरेद करू शकतात. वाचाः १० टक्के इंस्टेंट कॅशबॅकची ऑफर ई-स्टोर वरून शॉपिंग केल्यास ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआयचा फायदा मिळणार आहे. ओप्पोने यासाठी HDFC, स्टँडर्ड चार्टर्ड, कोटक आणि बजाज फायनान्स सारख्या प्रमुख बँक ऑपरेटर्स सोबत वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० टक्के इस्टेंट डिस्काउंट दिला जाणार आहे. वाचाः ओप्पोची १ रुपयाची फ्लॅश डील मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने W31, Oppo W11 आणि Oppo Band Style सारख्या वियरेबल वस्तूंवर १ रुपयांची फ्लॅश डील दिली आहे. याशिवाय, ओप्पोने १ रुपयाच्या मिस्ट्री बॉक्स सुद्धा आणला आहे. ज्यात ग्राहकांना Oppo F19 Pro+ पासून ओप्पो बँड स्टायल मिळू शकतो. वाचाः स्मार्टफोन्सवर ८० टक्के डिस्काउंट ओप्पो A5 2020, ओप्पो A5s, ओप्पो F11, ओप्पो F15 आणि Oppo Reno 10x Zoom सारख्या स्मार्टफोन्सवर ८० टक्के सूटची फ्लॅश डील आणली आहे. ओप्पोच्या ई-स्टोरवरून शॉपिंग करताना फायदेच फायदे होणार आहे. ओप्पोने बंडल ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत Oppo Reno 5 Pro आणि Oppo W31, Oppo F19 आणि Oppo 31, Oppo A15s आणि ओप्पो W11 आणि Oppo F17 Pro आणि W11 चे कॉम्बिनेशन खरेदीवर १ हजार रुपयांची बचत होणार आहे. चाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eyQVvt