Full Width(True/False)

मस्तच! आता मोबाइलमध्ये इंटरनेट बंद करूनही WhatsApp वापरता येईल, येतेय नवीन फीचर

नवी दिल्लीः प्रसिद्ध मेसेजिंग अॅप WhatsApp वर असे एक फीचर येत आहे. ज्या फीचरची अनेकांना खूप दिवसांपासून उत्सूकता होती. या फीचर मुळे वेब व्हर्जन (WhatsApp Web) व्हॉट्सअॅपला मोबाइल सोबत कंप्यूटर वर सुद्धा चालवण्याची सुविधा मिळते. परंतु, यासाठी स्मार्टफोनमध्ये लागोपाठ इंटरनेट असणे गरजेचे नाही. हे नवीन फीचर आल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी फोनची गरज पडणार नाही. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तुम्हाला फोनमध्ये इंटरनेट बंद असले तरी व्हॉट्सअॅप वेब व्हर्जनचा तुम्ही वापर करू शकाल. वाचाः HackRead च्या एका रिपोर्टनुसार, आगामी काही काळात डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला मोबाइल वरून QR कोड स्कॅन करण्याची गरज पडणार नाही. कंपनी WhatsApp Web साठी अॅक्टिव मोबाइल कनेक्शनचे बंधन काढून टाकणार आहे. ज्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप सुरू राहिल त्यात इंटरनेटची गरज असेल. सध्या कंपनी या फीचरची टेस्टिंग करीत आहे. लवकरच युजर्संसाठी हे जारी केले जाईल. वाचाः रिपोर्टच्या माहितीनुसार, टेस्टिंग मध्ये सहभागी असलेल्या युजर्स ज्यावेळी व्हॉट्सअॅप वेबचा वापर करीत आहेत. त्यात एक मेसेज दिसतो. या मेसेज मध्ये स्पष्टपणे लिहिले की, व्हॉट्सअॅपची डेस्कटॉप अॅप किंवा वेब व्हर्जनचा वापर करण्यासाठी तुम्हाला फोन कनेक्ट ठेवण्याची गरज पडणार नाही. या फीचरमुळे जास्तीत जास्त चार डिव्हाइसवर वापर केला जाऊ शकेल. वाचाः लवकरच येणार मल्टी डिव्हाइस फीचर वर सांगितलेले फीचर हे Whatsapp च्या Multi-Device Feature चा एक भाग आहे. मल्टी डिव्हाइस फीचरद्वारे युजर्स एकाच अकाउंटवरून चार डिव्हाइसचा वापर करू शकतील. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मेन डिव्हाइससाठी इंटरनेट कनेक्शनची गरज नाही. या फीचरची टेस्टिंग केली जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tzEunG