नवी दिल्ली : भारतीय बाजारात गेल्या महिन्यात हा बजेट ५जी स्मार्टफोन लाँच झाला होता. १३,९९९ रुपये किंमतीत येणाऱ्या या फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. यात डायमेंसिटी 700 5G प्रोसेसर देण्यात आला आहे, सोबत ५००० एमएएचची बॅटरी मिळते. या फोनला ई-कॉमर्स वेबसाइट वरून बंपर ऑफरसह खरेदी करता येईल. Realme 8 5G वर एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय ऑफऱ मिळत आहे. तुम्ही कमी बजेटमधील उत्तम ५जी स्मार्टफोन शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनवर काय काय ऑफर्स आहेत ते जाणून घेऊया. वाचाः Realme 8 5G किंमत आणि ऑफर्स याच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेंज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. याचे तिसरे व्हेरिएंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचे असून, याची किंमत १६,९९९ रुपये आहे. हा फोन सुपरसॉनिक ब्लॅक आणि सुपरसॉनिक ब्लू रंगात उपलब्ध आहे. वाचाः एक्चेंज ऑफरबद्दल सांगायचे तर फोनच्या ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंटवर १३,१०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जुना फोन एक्सचेंज केल्यानंतर पूर्ण लाभ मिळाल्याल फोन केवळ ८९९ रुपयात तुमचा होईल. ४ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटवर १४,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर असून, पूर्ण एक्सचेंज वॅल्यू मिळाल्यास फोनला ५४९ रुपयात खरेदी करता येईल. ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर १४,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळते. पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास, २,३९९ रुपयात फोन मिळेल. फोनला नो कॉस्ट EMI वर खरेदी करणे शक्य आहे. सोबतच, स्टँडर्ड ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे. स्टँडर्ड ईएमआयवर ग्राहक ४७९ रुपये प्रति महिना देऊन फोन खरेदी करू शकतात. अन्य ऑफर्सबद्दल सांगायचे तर YES बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ७ टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तर च्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. वाचाः Realme 8 5G चे फीचर्स फोनमध्ये ६.५ इंच फूल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी ७०० (MT६८३३) प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेजचा पर्याय मिळेल. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर इतर दोन कॅमेरे प्रत्येकी २-२ मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wxIpD8
